सांगली : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा आज रविवारी इस्लामपुरातील सर्व पुरोगामी समविचारी पक्ष संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी राज्यपाल कोश्यारीच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करण्यात आले. मुंबई बद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल जनमानसान रोष असून याविरोधात राज्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे.
[read_also content=”सुझान खान बॉयफ्रेंडसोबत करतेय Chill!!! सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ https://www.navarashtra.com/movies/sussanne-khan-chilling-with-her-boyfriend-video-shared-on-social-media-310231.html”]
यावेळी इस्लामपूर येथे आंदोलन कर्त्यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर आंदोलकांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. विद्रोही सांस्कृतिकचे कॉम्रेड धनाजी गुरव म्हणाले,”भाजप व आरएसएस ची भूमिका पुन्हा पुन्हा राज्यपाल बोलत आहेत. ती भूमिका महाराष्ट्राची व मराठी माणसांचा अपमान करणारी आहे. महाराष्ट्र व मुंबई हा मराठी माणसाने लढून मिळवलेला असल्याने असले वक्तव्य महाराष्ट्रात खपऊन घेतले जाणार नाही.” संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष दिग्विजय पाटील, म्हणाले की, “राज्याच्या घटनात्मक पदावर सर्वोच्च स्थानी असणाऱ्या राज्यपालांनी केलेली वक्तव्ये बेताल आहेत. ते सतत अशी वक्तव्य करत असल्याने त्यांचे मानसिक आरोग्य तपासायला हवे. असे राज्यपाल राज्याच्या इतिहासाला काळीमा आहेत. राज्यपालांना हटवल्याशिवाय मराठी माणूस स्वस्त बसणार नाही.
[read_also content=”यूएस केंटकीमध्ये पूर, २५ लोकांचा मृत्यू, मृतांमध्ये एकाच कुटुंबातील ४ मुलांचा समावेश https://www.navarashtra.com/world/elon-musk-action-against-twitter-nrsr-309945.html”]