mp sharad pawar reaction on Pahalgam Terrorist Attack jammu kashmir
राज्याच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृती खालावली असल्याची माहिती आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी आपले पुढील चार दिवसांचे नियोजित दौरे रद्द केल्याचे समजते. मात्र, त्यांना नेमका कोणता त्रास होत आहे, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती उपलब्ध झालेली नाही. त्यांच्या तब्येतीच्या बातमीमुळे समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेले दोन दिवसांपासून शरद पवार हे सांगली, कोल्हापूरच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यातील आयोजित कार्यक्रमांमध्ये शरद पवार यांना बोलताना अडचण होत होती. सर्दी, खोकला त्यानंतर त्यांची तब्येत खालावल्यामुळे शरद पवार यांच्या डॉक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्यांचे दौरे रद्द करण्यात आले आहेत.
Viral Video: मुंबई लोकलच्या फर्स्ट क्लासमध्ये सीटवरुन पुरुषांमध्ये राडा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर राजकीय परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली आहे. अजित पवार यांच्या उठावानंतर पक्ष दोन गटांमध्ये विभागला गेला राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट. यामध्ये अनेक आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला, ज्यामुळे पक्षाचं अधिकृत चिन्ह आणि नाव अजित पवार यांना मिळालं.शरद पवार यांना तुतारी हे नवं चिन्ह मिळालं.
नव्या चिन्हावर लढत लोकसभा निवडणुकीत मोठा प्रभाव दाखवला. बारामतीसारख्या बालेकिल्ल्यात महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा पराभव करून सुप्रिया सुळे विजयी झाल्या.लोकसभा निवडणुकीतील यशानंतर विधानसभा निवडणुकीत मात्र परिस्थिती वेगळी होती. महायुतीने जोरदार पुनरागमन करत राज्यात 232 जागांसह स्पष्ट बहुमत मिळवले. भाजपने 131 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून स्वतःला सिद्ध केले. याउलट, महाविकास आघाडीला मोठा फटका बसला, जिथे तिन्ही पक्ष मिळून केवळ 50 जागा जिंकू शकले. राष्ट्रवादी शरद पवार गटाला फक्त 10 जागांवर समाधान मानावं लागलं.
पुण्यात हाहाःकार! धोका वाढला; GBS च्या रुग्णात वाढ, 73 जणांना बाधा तर 14 जण
तथापि, या पराभवाने शरद पवार यांनी हार मानली नाही. त्यांनी राज्यभर दौऱ्यांना पुन्हा सुरूवात केली आणि महायुतीवर सातत्याने टीका केली. सध्या त्यांच्या तब्येतीमुळे दौरे थांबवावे लागले असले तरी त्यांच्या राजकीय सक्रियतेमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये ऊर्जा कायम आहे.
शरद पवार यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरदचंद्र पवार गटाच्या कार्यालयात होणाऱ्या 75 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण सोहळ्याला ते उपस्थित राहणार नाहीत. या प्रसंगी ध्वजारोहण माजी स्थायी समिती अध्यक्ष श्रीकांत शिरोळे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती प्रशांत जगताप यांनी दिली आहे. शरद पवार यांच्या अनुपस्थितीतही हा सोहळा साध्या पण सन्मानपूर्वक साजरा होणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.