पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय कामगिरी; दक्षिण कोरियामध्ये करणार प्रतिनिधित्व

'रोबोटेक्स इंडिया नॅशनल चॅम्पियनशिप २०२६' मध्ये पुणे जिल्ह्यातील २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यातील दोघांची निवड दक्षिण कोरियातील स्पर्धेसाठी झाली आहे.
Pune Zilla Parishad student selected for international competition South Korea
पुण्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची दक्षिण कोरियातील स्पर्धेसाठी निवड (फोटो - टीम नवराष्ट्र)
Published on: 
Updated on: 
  • जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी

  • दोन विद्यार्थ्यांची रोबोटेक्स इंटरनॅशनल चॅम्पियनशिप २०२६साठी निवड

  • दक्षिण कोरियातील सोल येथे होणाऱ्या स्पर्धेत करणार प्रतिनिधित्व

आकाश ढुमे : पुणे : जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांनी रोबोटिक्स, कोडिंग आणि नवकल्पनांच्या क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 'रोबोटेक्स इंडिया नॅशनल चॅम्पियनशिप २०२६' मध्ये पुणे जिल्ह्यातील २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. करेगाव आणि लोणीकंद येथील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा प्रकारांत यश मिळविले असून, लोणीकंद शाळेतील श्रीराज शिंदे आणि आरोही उजगरे यांची दक्षिण कोरियातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

करेगाव जिल्हा परिषद शाळेतील ५६ विद्यार्थ्यांनी फियाटच्या सहकार्याने स्पर्धेत सहभाग घेतला. त्यापैकी दोन संघांनी टॉप १० मध्ये, तर एका संघाने टॉप ३ मध्ये स्थान मिळविले. लोणीकंद जिल्हा परिषद शाळेतील झेडएस असोसिएट्सच्या सहकार्याने सहभागी झालेल्या १५८ विद्यार्थ्यांपैकी दोन संघांनी टॉप १० मध्ये स्थान पटकावले. उद्योजकता आव्हान आणि फोक रेस या प्रकारांत विद्यार्थ्यांनी विशेष कामगिरी केली.

सोलमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

लोणीकंद शाळेतील इयत्ता सहावीतील श्रीराज अभिजित शिंदे आणि सातवीतील आरोही रामचंद्र उजगरे यांची रोबोटेक्स इंटरनॅशनल चॅम्पियनशिप २०२६ साठी निवड झाली आहे. २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी दक्षिण कोरियातील सोल येथे होणाऱ्या स्पर्धेत ते भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

‘शिक्षणाचे माहेरघर हे गुन्हेगारांचे आवडते घर झाले...’; रोहित पवारांचा घणाघात

विद्यार्थ्यांनी ‘स्कोव्हेरा’ हे बहुभाषिक शालेय ॲप विकसित केले आहे. इंटरनेटशिवाय कार्यरत असलेल्या या ॲपद्वारे उपस्थिती, विद्यार्थी सुरक्षा, शैक्षणिक माहिती आणि पालक-शिक्षक संवाद सुलभ करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. फोक रेस आणि गर्ल्स फायर फायटिंग या स्पर्धांमध्येही ते सहभागी होणार आहेत.

ग्रामीण विद्यार्थ्यांना रोबोटिक्स, कोडिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि एसटीईएम शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद आणि कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

'पुण्याच्या कायदा-सुव्यवस्थेचे अक्षरशः तीनतेरा वाजलेत...' शिवाजीनगर गोळीबार घटनेवरून सुप्रिया सुळेंचा संताप

जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आणि अध्यक्ष विरधवल जगदाळे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. ग्रामीण विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Q

रोबोटेक्स इंडिया नॅशनल चॅम्पियनशिप २०२६ मध्ये पुणे जिल्ह्यातील किती विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला?

A

रोबोटेक्स इंडिया नॅशनल चॅम्पियनशिप २०२६ मध्ये पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. करेगाव आणि लोणीकंद येथील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी केली.

Q

दक्षिण कोरियातील आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेसाठी कोणत्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे?

A

लोणीकंद जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता सहावीतील श्रीराज अभिजित शिंदे आणि सातवीतील आरोही रामचंद्र उजगरे यांची रोबोटेक्स इंटरनॅशनल चॅम्पियनशिप २०२६ साठी निवड झाली आहे.

Q

दक्षिण कोरियातील रोबोटेक्स इंटरनॅशनल चॅम्पियनशिप २०२६ कधी आणि कुठे होणार आहे?

A

ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा २८ आणि २९ नोव्हेंबर २०२६ रोजी दक्षिण कोरियातील सोल येथे होणार आहे. या स्पर्धेत श्रीराज शिंदे आणि आरोही उजगरे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.