‘शिक्षणाचे माहेरघर हे गुन्हेगारांचे आवडते घर झाले...’; रोहित पवारांचा घणाघात

शिवाजीनगर परिसरामध्ये झालेल्या गोळीबार व हल्ल्याच्या घटनेवरून विरोधकांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. आमदार रोहित पवार यांनी कायदा व सुव्यवस्था पोकळ झाल्याचे दिसून येत असल्याची टीका केली.
Rohit pawar reaction on shivajinagar crime case pune.jpg
आमदार रोहित पवार यांनी पुण्यातील शिवाजीनगर परिसरामध्ये झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया देत महायुती सरकारवर निशाणा साधला.
Published on: 
Updated on: 
  • पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेवर रोहित पवारांचा हल्लाबोल

  • न्यायालयाच्या दारातच गँगवार झाल्याने रोहित पवार आक्रमक

  • नवे पुण्याचे शिल्पकार’ काय बोलणार? अशी केली टीका

आकाश ढुमे : पुणे :  पुण्यातील शिवाजीनगर परिसरामध्ये मंदार किवळे याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली असून दिवसाढवळ्या गर्दीच्या ठिकाणी हा हल्ला झाल्याचे कायदा व सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. यावर आता आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.

रोहित पवार यांनी पुण्याची बदलती गुन्हेगारी परिस्थिती आणि सरकारच्या कारभारावर त्यांनी सोशल मीडिया पोस्ट करून निशाणा साधला. रोहित पवार यांनी लिहिले, ‘जिथं न्याय मिळतो, त्या न्यायालयाच्या दारातच गँगवार झाल्याची घटना आज पुण्यात घडली. यावरूनच राज्याची कायदा-सुव्यवस्था किती पोकळ झाली आहे, हे दिसून येते.’

पुढे त्यांनी लिहिले, ‘एकेकाळी शिक्षणाचं माहेरघर असलेलं पुणे भाजपच्या काळात गुन्हेगारांचं आवडतं घर झालंय ही सत्यता कोणीच नाकारू शकत नाही. भाजपच्या काळात पुणे गुन्हेगारांचे आवडते घर झाले आहे, ही सत्यता कोणीच नाकारू शकत नाही,’ असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर टीका केली.

'पुण्याच्या कायदा-सुव्यवस्थेचे अक्षरशः तीनतेरा वाजलेत...' शिवाजीनगर गोळीबार घटनेवरून सुप्रिया सुळेंचा संताप

गुन्हेगारांवर कारवाई केल्यानंतर प्रसिद्धी आणि बॅनरबाजी करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना या गंभीर घटनेवर काय भूमिका घ्यायची, असा सवालही पवार यांनी उपस्थित केला. ‘दोन-चार गुंडांना पकडून बॅनरबाजी करणारे नव पुण्याचे शिल्पकार यावर काय बोलणार?’ असा टोला त्यांनी लगावला.

या घटनेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी लिहिले की,न्यायायालय हे सर्वसामान्य माणसासाठी 'न्यायदानाचे मंदिर' असते. जिथे प्रत्येक नागरिक न्यायाच्या आणि संरक्षणाच्या अपेक्षेने येतो, त्याच पवित्र वास्तूच्या परिसरात जर भरदिवसा रक्ताचा सडा पडत असेल, तर सर्वसामान्य पुणेकरांनी कोणाकडे पाहायचे? विशेष म्हणजे, या परिसरात पोलीस चौकी आहे, सुरक्षा बंदोबस्त आहे आणि पोलिसांची सततची वर्दळ असते. तरीही भरदिवसा शस्त्रे घेऊन येण्याची आणि खून करण्याची हल्लेखोरांची हिंमत होतेच कशी? गुन्हेगारांना कायद्याचा आणि पोलिसांचा कोणताही धाक उरलेला नाही, हेच यावरून स्पष्ट होते.”

पुण्यात भरदिवसा गोळीबार; शिवाजीनगर कोर्टाबाहेर घडला थरार, एक जखमी

न्यायालयाच्या परिसरातील गँगवारच्या घटनेमुळे पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, या प्रकरणावर राजकीय आरोप-प्रत्यारोप तीव्र होण्याची शक्यता आहे.