Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Latur News: उदगीरमध्ये अनधिकृत सावकारीवर धाड; कोरे स्टॅम्प पेपर व धनादेश जप्त

उदगीर येथील तिघा जणांच्या घरावर अनाधिकृत सावकारी प्रकरणी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाने छापे मारून सह्या असलेले कोरे स्टॅम्प पेपर, कोरे धनादेश व संशयास्पद कागदपत्रे जप्त केली आहेत.

  • By Priti Hingane
Updated On: Mar 02, 2026 | 02:19 PM
Latur News: उदगीरमध्ये अनधिकृत सावकारीवर धाड; कोरे स्टॅम्प पेपर व धनादेश जप्त (फोटो-सोशल मीडिया)

Latur News: उदगीरमध्ये अनधिकृत सावकारीवर धाड; कोरे स्टॅम्प पेपर व धनादेश जप्त (फोटो-सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • उदगीरात अवैध सावकारीप्रकरणी तीन ठिकाणी छापे
  • सहाय्यक निबंधक कार्यालयाची कारवाई
  • कोरे धनादेश व संशयास्पद कागदपत्रे जप्त
Latur News: उदगीर येथील तिघा जणांच्या घरावर अनाधिकृत सावकारी प्रकरणी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाने छापे मारून सह्या असलेले कोरे स्टॅम्प पेपर, कोरे धनादेश व संशयास्पद कागदपत्रे जप्त केली आहेत. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात गौतम काळबा सूर्यवंशी (रा. क्रांतीनगर), उमाकांत गणपती कांबळे (रा. गुरधाळ, ता. उदगीर), संजीवकुमार गोविंदराव सगर (रा. आनंदवाडी, ता. देवणी) आणि राजेंद्र गणपती कांबळे (रा. गुरधाळ, ता. उदगीर) यांनी अवैध सावकारीसंदर्भात तक्रार अर्ज दाखल केले आहेत. तसेच अवैध सावकारीसंदर्भात काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

या तक्रारींची दखल घेऊन सहाय्यक निबंधक बी. एस. नांदापूरकर यांच्या नेतृत्वाखाली तीन पथके नियुक्त करण्यात आली होती. या पथकांनी शुक्रवारी (दि. २७) शहरातील चर्च रोड येथील रविप्रभा गणपत मोतेवाड व गणपत मोतेवाड यांच्या घराची झडती घेतली. तसेच निडबन येथील काशिनाथ विश्वनाथ सोमवंशी आणि शहरातील येणकी रोडवरील पिराजी बाबुराव बालुरे या तीन अनाधिकृत सावकारांच्या घरांची झडती घेण्यात आली. या कारवाईमध्ये सह्या असलेले कोरे स्टॅम्प पेपर, कोरे धनादेश व संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी महाराष्ट्र सावकारी नियमन कायद्यातील तरतुदीनुसार जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांची तपासणी व संबंधितांचे जबाब घेण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सहाय्यक निबंधक बी. एस.
नांदापूरकर यांनी सांगितले.

कारवाईसाठी नियुक्त तीन पथकांमध्ये सहकार अधिकारी एन. एस. शेख, आर. डी. ढगे, अश्विनी पुढेवाड, बी. एच. शिंदे, रुपेश संघई, गोविंद मुंडे, सी. एम. धोंडगे, एच. डी. शिवनेचारी, जीवन चोले, पराग देशमुख, यांच्यासह पोलीस कर्मचारी सहभागी होते. उदगीर शहर व तालुक्यातील अनेक गावात अनाधिकृत सावकारी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अवैध सावकारी व्यवसाय करणारे सावकार कर्जदारांकडून कोरे सह्या असलेले स्टॅम्प पेपर व कोरे धनादेश घेऊन ५ ते २० टक्के दराने व्याजाने पैसे देण्यात येत असल्याची चर्चा आहे. आडी अडचणी साठी कर्ज घेतलेल्या कर्जदारांकडून मोठ्या प्रमाणात व्याज वसूल केले जाते.

महाराष्ट्र शासनाने सन २०१४ मध्ये महाराष्ट्र सावकारी अधिनियम हा कायदा लागू केलेला आहे. या कायद्यातील तरतुदीनुसार अवैध सावकारी सिद्ध झाल्यास ५ वर्षे कारावास व ५० हजार रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. अवैध सावकारामुळे त्रस्त असलेल्या व्यक्तींनी कोणतेही टोकाचे पाऊल न उचलता संबंधिताविरुद्ध सावकाराचे सहाय्यक निबंधक तथा सहाय्यक निबंध सहकारी संस्था कार्यालयात रीतसर तक्रारी दाखल करावेत, असे आवाहन सहाय्यक निबंधक बी. एस. नांदापूरकर यांनी केले आहे. या प्रकरणी महाराष्ट्र सावकारी नियमन कायद्यातील तरतुदीनुसार जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांची तपासणी व संबंधितांचे जबाब घेण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सहाय्यक निबंधक बी. एस. नांदापूरकर यांनी सांगितले.

Web Title: Raid on unauthorized moneylenders in udgir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 02:19 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.