Raigad News: महाडमध्ये SIR चा पहिला टप्पा पूर्ण; 45 हजार 463 मतदारांची गणना पत्रे अद्याप गायब
यासंदर्भात अधिक माहिती देताना ओमासे यांनी सांगितले की, एकूण प्राप्त झालेल्या २ लाख ४९ हजार ९८६ गणना पत्रांपैकी १ लाख ७ हजार ८०० मतदारांनी स्वतःहून ‘सेल्फ मॅपिंग’ केले आहे. ऑफलाइन पद्धतीने २ लाख ४९ हजार ४७ गणना पत्रे प्राप्त झाली असून, त्यापैकी १ लाख २९ हजार ३३२ मतदारांचे मॅपिंग झाले आहे. ऑनलाइन पद्धतीने ९३९ गणना पत्रे प्राप्त झाली असून, अद्याप १२ हजार ८५० मतदारांचे मॅपिंग झालेले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (फोटो सौजन्य – AI Created)
दरम्यान, गणना पत्र प्राप्त न झालेल्या ४५ हजार ४६३ मतदारांपैकी १४९ मतदार मयत असल्याचे निष्पन्न झाले आहे. सर्वाधिक म्हणजे २४ हजार ७४८ मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच ५ हजार १२२ मतदार दुबार असल्याचे आढळून आले असून, १ हजार ४३२ मतदार अनुपस्थित आहेत. अन्य कारणांमुळे १५२ मतदारांची स्वतंत्र नोंद करण्यात आली आहे.






