स्टेट बैंक ऑफ इंडिया (एसबीआय) या बँकेकडून रायगड जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष सुविधा पुरविल्या जाणार आहेत. सोमवारी यासाठीचा करार रायगड जि.प. मुख्य अधिकारी नेहा भोसले यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
आघाडी-महायुतीच्या अनेक इच्छुकांनी यंदा तिकीट न मिळाल्यामुळे स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतला. आघाडी-महायुतीच्या उमेदवारांसमोर अपक्षांचे आव्हान उभे राहिले आहे. यंदाच्या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले होते की, राज्य संस्थांच्या ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण निवडणूक घ्या. मात्र जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीबाबत राज्य निवडणूक आयोगाने अद्याप कोणतीही घोषणा केली नाही.
अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने श्री स्वयंभू गणपती मुगवली मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर कमिटीकडून सुरक्षा तसेच स्वच्छतेसंदर्भात आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे.
मुरुड तालुक्यातील सावली ग्रामपंचायत हद्दीमधील खामदे ग्रामस्थांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वात जास्तीचे मतदान व्हावे, अशी अपेक्षा खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्
कोकणात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदाची थंडी अधिक तीव्र आहे. काही भागांत धुके आणि तापमानात लक्षणीय घट झाली आहे.
माथेरान डोंगरातील त्या सर्व आदिवासी वाड्या देश स्वातंत्र्य होण्याच्या १०० वर्षे आधीपासून अस्तित्वात आहेत. मात्र त्या ठिकाणी रस्त्याची कामांसाठी अनेक समस्या येत आहेत. त्यामुळे आता ग्रामस्थांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला…
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेलमध्ये कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला. यावेळी आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
म्हसळा न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकत असलेल्या गर्वांगचा मृत्यू झाल्याची घटना काही महिन्यांपूर्वी समोर आली होती. या प्रकरणी उपचारांत निष्काळजीपणा केल्याच्या आरोपाकाली वैद्यकिय अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली होती.
शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर वारंवार टीकास्त्र सोडले होते. दरम्यान, शिंदे गटाकडून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्यावरही सोशल मीडियावरून टीका केली.
रायगड जिल्ह्याला विस्तृत आणि मनमोहक समुद्र किनारा लाभला आहे. जिल्ह्यातील विविध समुद्र किनारे व पर्यटनस्थळांवर गर्दी वाढली आहे. स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर शिवप्रेमी मोठ्या संख्येने येत आहेत.
रायगडच्या खोपोलीत नगरसेविकेचे पती मंगेश काळोखे यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी 9 आरोपी अटकेत आहेत. आमदार महेंद्र थोरवेंनी या हत्येला ‘बीड कनेक्शन’ असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
शेकापच्या वाहतूक सेलचे रायगड जिल्हाध्यक्ष व माजी ग्रामपंचायत सदस्य जयेंद्र बबन शेळके यांनी भाजपात प्रवेश केला आहे. जयेंद्र शेळके यांनी शेकापची साथ सोडून भाजपात जाहीर प्रवेश केला आहे.
रायगडमध्ये नगरसेविकेचे पती निलेश काळोखे यांची भरदिवसा निर्घृण हत्या झाली. मुलांना शाळेत सोडून येताना ५–६ जणांनी तलवार, कोयत्याने २७ वार केले. CCTV समोर आल्यानंतर प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे.
श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील प्रवासी शासकीय कामकाज, शिक्षण, आरोग्य सेवेसाठी माणगावात जातात. मात्र एसटी सेवा उपलब्ध नसल्याने या प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
महाडकरांसाठी आनंदाची बातमी! महाडमध्ये टेक्नॉलॉजीचा नवा अध्याय सुरु झाला आहे. हिरवळ एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून तालुक्यात पहिले AI सेंटर सुरू करण्यात आले आहे. महाडच्या हिरवळ संस्थेचा मोठा पराक्रम आहे.
माथेरानघाट रस्त्यावरील निकृष्ट डांबरीकरणाचा फटका आता वाहन चालकांना बसत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. माथेरानघाट रस्त्याची अवस्था पाहून संताप व्यक्त केला जात आहे.
अलिबाग तालुक्यातील कुरुळ बायपास ते बेलकडे जाणाऱ्या महामार्गाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडले आहेत. त्यामुळे प्रवास करताना वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.