ramila latpate world tour
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया (Digital India) भाषणाने प्रेरित होऊन जगभरात भारताची डेव्हलप इंडिया व्हिजनची छबी पसरविण्यासाठी मोटरसायकलने जगभ्रमंतीचा मानस (World Tour On Motorcycle) करणाऱ्या एका तरुणीची सध्या खूप चर्चा सुरु आहे. रमिला लटपटे (Ramila Latpate) असं या तरुणीचं नाव आहे. महिला दिनाचे औचित्य साधत रमिलाने आपल्या प्रवासाची सुरुवात केली आहे. या जगभ्रमंतीच्या मोहिमेचा फ्लॅग ऑफ सोहळा नुकताच मुंबईतील गेट-वे ऑफ इंडियाजवळ संपन्न झाला.
भारत देशात प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत आता मराठमोळ्या वेशात नऊवारी साडी नेसून तरुणी रमिला लटपटे मोटरसायकल वरून जगभ्रमंतीचा प्रवास करून एक नवीन इतिहास रचणार आहे. या प्रवासाची सुरुवात 9 मार्च रोजी गेट-वे-ऑफ पासून झाली असून सुमारे 365 दिवस प्रवास करून 8 मार्च 2024 रोजी पुन्हा भारतात परतणार आहे.
12 खंड, 20 ते 30 देशातून प्रवास
जगभ्रमंतीमध्ये 12 खंड, 20 ते 30 देशातून प्रवास करित सुमारे एक लाख किलोमीटर्सचा प्रवास ती पुर्ण करणार आहे. फक्त प्रवास नाही करणार तर महाराष्ट्रातील विविध बचत गटाच्या माध्यमातून बनविण्यात आलेले विविध साहित्य, पदार्थ आणि भारतीय संस्कृतीचा प्रसार करीत भारत व महाराष्ट्राची संस्कृती प्रत्येक देशापर्यंत पोहोचविण्याचा मानस भारताची मुलगी रमिला लटपटेचा आहे.
रमा (रायजींग एबल मॅनकाईंड ऑल राऊंड) या जगभ्रमंती मोहिमेचे नियोजन केले आहे. यापुर्वी रमाबाईने भारतातील अनेक ठिकाणी मोटरसायकलने प्रवास केला आहे, त्यामुळेच जगभ्रमंतीचा ध्येय जोपासले आहे. रमिला लटपटे या चिंचवड (पुणे) येथील निवासी आहेत. त्या अहिल्या फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेसाठी महिला व तरुणांच्या सक्षमीकरणाचे उपक्रम राबवतात.