
शिरगाव : चिपळूण तालुक्यातील ग्रामीण औद्योगिक विकासासाठी विकसित झालेल्या गाणेखडपोली परिलरातील गेली 40 वर्ष सुरू असलेल्या साफ ईस्ट कंपनीतील दोनशेहून अधिक कामगारांनी शुक्रवारी सकाळपासून आमरण उपोषण सुरू केले. गेले दोन महिने सुरू असलेला संघर्ष कामगार आयुक्त कार्यालयात तडजोडीतून लेखी आश्वासन दिल्यावर मिटला. 30 ऑक्टोबरपर्यंत सर्वांना कामावर घेण्याचे ठरवलं देखील होतं. मात्र कंपनीच्या मालकाने ऐनवेळी दगाफटका केल्याने स्थानिक सर्व कामगारांनी व्यवस्थापनाच्या मनमानी भूमिकेबद्दल तीव्र संताप व्यक्त करत हे पाऊल उचलले आहे.
कंपनीत 75महिला कामगार ,कायम 14 कामगार आणि काही नव्या कामगाराच्या हातून काम काढून घेण्यात येत आहे.तर चिपळुणातील काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी परप्रांतीय कामगार आणण्याची तयारी दर्शवली आहे.स्थानिक लेबर कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळावे म्हणून कंपनीच्या बाजूने राहण्याची भूमिका दिसून येत आहे.आपल्याला कोणीच राजकीय पदाधिकारी न्याय मिळवून देत नाही.
14 कायम व अडीचशे कंत्राटी कामगार अशी मनुष्यबळाची रचना इथे आहे. कामावर अपमानाची वागणूक,शासकीय नियमांचे उल्लंघन ,सुरक्षा साधनं,रजा अशा मुद्यांवर जो चर्चा करेल किंवा जाब विचारेल तो निलंबित अशी भूमिका असल्याने आजुबाजूच्या स्थानिक मंडळींनी हा पवित्रा घेतला. दरम्यान येथे असलेल्या युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी आमची वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याचे सांगितले मात्र ऊ पोषणकर्ते यावर समाधानी नसून दीर्घकाळ आम्ही सभासद आहोत. कोणताच प्रश्न सुटला नाही त्याबद्दल नाराजी व्यक्त केली.सरेश्मा पवार,प्रिया भुवड,शिल्पा शिंदे उपोषण कर्त्यासोबत दिवसभर असून,सुधीर शिंदे,स्वप्नील शिंदे,दशरथ दाभोलकर,यांनी भेट दिली. वालोटी,गाणेखडपोली , दसपटी विभागातील अनेकांनी उपोषणाला पाठिंबा दर्शवला आहे.
उपोषणाला आमदार शेखर निकम यांनी भेट देऊन कामगार यांचे म्हणणे जाणून घेतले त्यानंतर रत्नागिरी जिल्हाधिकारी यांना फोन द्वारे संपर्क साधला तर भाजपच्या नेत्या चित्राताई चव्हाण यांनी उपोषण स्थळी भेट दिली यावेळी खासदार नारायण राणे यांना फोन करून माहिती दिली त्यानुसार खासदार नारायण राणे हे कंपनीच्या मालक यांच्याशी थेट संवाद साधून कामगार यांचा प्रश्न मार्गी लावणार आहेत त्यामुळे कामगार यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत.
Ans: कंपनी व्यवस्थापनाने 30 ऑक्टोबरपर्यंत सर्व कामगारांना कामावर घेण्याचे लेखी आश्वासन दिले होते, परंतु ऐनवेळी दगाफटका करून ते पाळले नाही. त्यामुळे कामगारांनी संतप्त होऊन आमरण उपोषण सुरू केले.
Ans: युनियन पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे की वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे, परंतु कामगारां;च्या मनात असंतोष आहे.
Ans: व्यवस्थापनाची मनमानी आणि गैरवर्तन शासकीय नियमांचे उल्लंघन सुरक्षा साधनांची कमतरता रजेबाबत नियमांचे दुर्लक्ष प्रश्न विचारल्यास निलंबनाची धमकी