गोगटे जोगळेकर कॉलेजला सुवर्णपदक (फोटो- istockphoto)
या स्पर्धेत महाविद्यालयाच्या महिला संघाने – कांस्य पदकासहीत तृतीय क्रमांक प्राप्त केला. तर पुरूष संघाने सुवर्ण पदकासहीत कोंकण विभाग टेबल टेनिस सन २०२६-२७ स्पर्धेचे अजिंक्यपद प्राप्त केले. सुवर्णपदक प्राप्त महाविद्यालयाच्या पुरुष टेबल टेनिस संघात अथर्व म्हस्के, आदित्य शिर्के, रोहन जाधव, आदित्य लांजेकर (तृतीय वर्ष विज्ञान), विशाल परिहार (तृतीय वर्ष बीबीए) हे विद्यार्थी सहभागी झाले होते.
तर कांस्य पदक प्राप्त महिला टेबल टेनिस विजयी संघात स्नेहा कदम, मैथिली डोर्लेकर, श्रावणी शिंदे (तृतीय वर्ष विज्ञान), समृध्दी मुळ्ये, आदिती जड्यार (तृतीय वर्ष बीबीए) या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.महाविद्यालयाच्या पुरुष व महिला टेबल टेनिस संघाला महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे यांचे मार्गदर्शन व क्रीडा शिक्षक प्रा. कल्पेश बोटके, श्रीपाद गुरव यांचे सहकार्य लाभले.
सुयशप्राप्त खेळाडूंना पदाधिकाऱ्यांच्या शुभेच्छा
स्पर्धेत सुयश प्राप्त करणाऱ्या सर्व खेळाडूंचे र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, संस्थेचे सर्व सदस्य तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, तीनही शाखांचे उपप्राचार्य, डॉ. विवेक भिडे, सर्व प्राध्यापक सहकारी, कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन केले.
Commonwealth TT : कॉमनवेल्थ टेबल टेनिसमध्ये पुण्याचा डंका; दोन युवा खेळाडूंची भारताच्या संघात निवड!

