Megablock
मुंबई : मध्य रेल्वे (Central Railway) मुंबई विभागात (Mumbai Division) विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी (Repair And Maintainance Work) आपल्या उपनगरीय विभागांत (Suburban Areas) आज मेगा ब्लॉक (Mega Block) परीचालित करणार आहे. पश्चिम मार्गावर कोणताही जम्बोब्लॉक घेण्यात येणार नाही(No jumbo block will be taken on western route).
१२१२६ पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस कर्जत-कल्याण मार्गे वळवली जाईल आणि निर्धारित वेळेच्या १०-१५ मिनिटे उशिरा पोहोचेल. सर्व अप आणि डाऊन मेल एक्सप्रेस अनुक्रमे अप फास्ट लाईन आणि डाऊन फास्ट लाईनवर वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या १० ते १५ मिनिटे उशीरा पोहोचतील.
वसई रोडवरून सकाळी ०९.५० वाजता दिव्यासाठी सुटणारी मेमू कोपर येथे थांबेल
दिवा येथून सकाळी ११.३० वाजता वसई रोडला जाणारी मेमू कोपरहून सकाळी ११.४५ वाजता सुटेल.
दिवा स्टेशन: ०४/०५.०३.२०२३ रोजी वाहतूक आणि पॉवर ब्लॉक
वांगणी – नेरळ डीएन लाईन : रहदारी ब्लॉक्स : मध्यरात्री ०३.०३.२०२३/०४.०३.२०२३ पर्यंत
LTT मुंबई : ४५ दिवसांसाठी ट्रॅफिक ब्लॉक : १३.०२.२०२३ ते १९.०३.२०२३
दौंड – मनमाड : २४.०३.२०२३ पर्यंत नॉन-इंटरलॉकिंग काम
सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर/वाशी येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई (CSMT, Mumbai)-कुर्ला आणि पनवेल-वाशी या मार्गांवर विशेष लोकल धावतील.
हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी/नेरुळ मार्गे ट्रान्सहार्बर मार्गावरून सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.