seagull birds will end the stay of foreign guests arriving at kalyan bay february is on its way back as the heat of summer begins nrvb
कल्याण : भयंकर जलप्रदूषणामुळे (Severe Water Pollution) आपल्या अखेरच्या घटका मोजत असणारा कल्याणचा खाडीकिनारा (Bayside of Kalyan) सध्या गोऱ्या गोमट्या परदेशी साहेबांच्या आगमनाने फुलून गेला आहे. शेकडो नव्हे तर हजारो किलोमीटरचा पल्ला गाठून हे ‘सीगल’ (Seagulls) नावाचे गोंडस परदेशी पाहुणे कल्याणात (Coming In Kalyan) दाखल झाले आहेत.
हे गोंडस पक्षी पाहण्यासाठी त्यांना कॅमेऱ्यात टिपण्यासाठी कल्याणकर, पक्षीप्रेमी (Bird Lovers) आणि निसर्ग छायाचित्रकारांची (Nature PhotoGraphers) जुन्या खाडी पुलावर मोठी गर्दी असते. फेब्रुवारीपर्यंत (Till February) या परदेशी पाहुण्यांचा कल्याणच्या खाडी किनारा परिसरात मुक्काम असणार आहे. त्यानंतर उन्हाळ्याची चाहूल लागताच पुन्हा एकदा हे पक्षी माघारी परततील.
[read_also content=”डोंबिवलीत आढळले अतिशय दुर्मिळ घुबड दिवा भीत https://www.navarashtra.com/maharashtra/diva-bhit-a-very-rare-owl-found-in-dombivli-kalyan-nrvb-370140.html”]
सीगल पक्षी हे अमेरिका (America) आणि युरोपमधून (Europe) हजारो किलोमीटरचा प्रवास करून भारतात येतात. हे पक्षी पाहण्यासाठी कल्याणकर दरवर्षी येथे मोठी गर्दी करतात. पांढरा शुभ्र रंग, पंखांवर करडा रंग, लालसर काळी चोच आणि काळेभोर बोलके डोळे असं मोहक रूप या पक्षाचं असतं. छोटे मासे आणि खेकडे हे या पक्षांचं मुख्य भक्ष्य. कल्याणमध्ये मात्र त्यांना शेव, चिवडा आणि कुरकुरे खायला दिले जातात. पण या गोष्टी त्यांच्यासाठी हानीकारक ठरतात. पक्षी तज्ज्ञांच्या मते, शेव खाल्यामुळे या पक्षांना उलटी होते.