दुष्काळाची भीषण कुऱ्हाड! 'आम्हाला सांभाळता येत नाही, तुम्हीच वाचवा'; अश्रू ढाळत शेतकरी सोडतायत गोवंश
Yavatmal News: कापसाने गाठला ९,६०० रुपयांचा भाव! कापसाचे दर वधारले, मात्र शेतकऱ्यांचे उत्पादन घटले
शेतकऱ्यांची ही भीषण परिस्थिती पाहता येत्या काही दिवसांत संस्थेतील गोवंशाची संख्या 1,000च्या पार जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे जनावरांची संख्या वेगाने वाढत आहे, तर दुसरीकडे पाणी आणि चाऱ्याचा तुटवडा निर्माण झाल्याने एवढा मोठा गोवंश कसा सांभाळायचा, असा गंभीर आणि आव्हानात्मक प्रश्न संस्थेसमोर उभा ठाकला आहे.
सध्या गावात विकत मिळणारे पाणीही अवघ्या दोन-तीन महिन्यांत संपण्याच्या मार्गावर आहे. भविष्यात नगर शहरातून पाण्याचे टँकर आणावे लागतील अशी चिंतेची बाब आहे. आज 1,000 रुपयांना मिळणारा टँकर उद्या 2,000 रुपयांपर्यंत विकत घ्यावा लागेल. चाऱ्याची टंचाई भागवण्यासाठी पंजाब आणि मध्य प्रदेशातून गव्हाचा भुसा मागवण्याची तयारी संस्थेने केली आहे. सध्या दिवसाला 10 ते 12 लाख रुपये खर्च येत असून, वाढत्या संख्येमुळे हा खर्च दुप्पट होण्याचा अंदाज आहे.
हिंदुत्ववादी नेत्यांचे मार्गदर्शन व सहकार्य असले तरी त्यांच्या मदतीलाही मर्यादा आहेत. त्यामुळे केवळ राजकीय नेत्यांवर अवलंबून न राहता सामान्य जनतेने या संघर्षाच्या काळात पुढे यावे, असे आवाहन संस्थेने केले आहे. माणसाच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था कशीही होऊ शकते, पण या मूक जनावरांकडे दुर्लक्ष झाले तर ते जगू शकणार नाहीत. आपण गोमातेचे रक्षण केले तर गोमाता आपले रक्षण करेल. या कठीण प्रसंगात जनतेने सढळ हाताने मदत करावी,”असे भावूक आवाहन निसर्गसृष्टी गोपालन संस्थेचे संस्थापक गौतम कराळे यांनी केले आहे.
Ans: भीषण दुष्काळामुळे चारा आणि पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. जनावरांच्या संगोपनाचा खर्च परवडत नसल्याने हतबल झालेले शेतकरी त्यांना सुरक्षित आश्रय मिळावा म्हणून गोपालन संस्थेकडे सोपवत आहेत.
Ans: अनेक शेतकऱ्यांचे आपल्या जनावरांशी जिव्हाळ्याचे नाते असते. वर्षानुवर्षे कुटुंबातील सदस्याप्रमाणे सांभाळलेल्या जनावरांना दुष्काळामुळे दुसरीकडे सोपवावे लागत असल्याने शेतकरी भावूक होत आहेत.
Ans: जनावरांसाठी चारा छावण्या, पुरेसा पाणीपुरवठा, अनुदानित पशुखाद्य, मोफत पशुवैद्यकीय सेवा आणि गोपालन संस्थांना आर्थिक मदत यांसारख्या उपाययोजनांची गरज आहे.
Ans:






