Go to side of power but from whom you have taken something from life; At least be aware of it – Sharad Pawar’s attack on NCP’s splinter group
राष्ट्रवादीच्या स्वाभिमान यात्रेची आज बीडमध्ये सभा झाली. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांवर जोरदार टीका करीत असताना, राष्ट्रवादीमधील फुटीर गटावरसुद्धा जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी आपल्या पक्षातून सत्तेत गेलेल्या नेत्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले. तुम्हाला सत्तेत जायचे जा, परंतु, तुम्हाला ज्यांनी आयुष्यभर दिले, त्याची निदान जाणीव जर ठेवली नाहीतर तुम्हाला मतदार तुमची जागा दाखवतील.
बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे कौतुक
बरेच दिवसातून संदीप क्षीरसागर यांच्या नियोजनाने हा सोहळा आयोजित केला. मला जुन्या काळाची आठवण झाली. जु्न्या काळाची आठवण निष्ठेबाबत बीडची जनता त्यांच्यामागे उभी राहते. मी महाराष्ट्रातील सरकारमध्ये होतो. महाराष्ट्राचे नेतृत्व यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने काम करीत होतो. खऱ्या नेतृत्वापेक्षा एक वेगळी भूमिका मांडायला सुरुवात एका कार्यकर्त्याने केली. केशरकाकूंनी आपली भूमिका त्या काळात भूमिका स्पष्ट करीत निष्ठेच्या बाबतीत आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही, असे सांगत आमच्याबरोबर उभ्या राहिल्या आणि यशस्वी झाल्या. आज त्याची पुनरावृत्ती त्यांच्या नातूने केल्याचा आनंद आहे.
मणिपूर हिंसाचारावरून पंतप्रधानांवर टीका
मणिपूर हा भारताच्या उत्तरेचा भाग, अरुणाचल प्रदेश, नॉर्थ इंड़ियाबाबत सांगायचे सोडून, मणिपूरच्या सीमा सर्व आजूबाजूच्या देशांना लागली. दोन समाजात तेढ, हिंसाचार होत असताना, भाजपचे सरकार यावर काही भूमिका घेत नाही. जात, धर्म आणि भाषा यातून तेढ कशी निर्माण होईल याची खबरदारी आताचे सत्ताधारी घेत असल्याचे पाहायला मिळाले.
समाजाला शांत करण्याची गरज होती, पंतप्रधान फक्त 3 मिनिटे बोलले. अशी स्थिती अनेक राज्यात असताना, त्याच्यावर काम करायचे सोडून
कर्ऩाटकला सरकार पाडले, मध्य प्रदेशमध्ये सरकार पाडले, महाराष्ट्रात पाडले, तुम्ही स्थिर सरकार देण्याची भूमिका बोलता आणि राज्यातील सरकारे पाडता.
आज या ठिकाणी जितेंद्र आव्हाडांच्या शहरात शासकीय रुग्णालयात दोन दिवसांत 18 जणांचा मृत्यू होतो. हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळे हे सरकार कुठे चालले आहे. आमच्याबरोबर असणारे काही सहकारी, वेगळी भूमिका घेत,
सत्तेतील नेत्यांना तुरुंगात टाकण्याचे काम चालू आहे.
आज सत्तेचा गैरवापर करून लोकांना तुरुंगात डांबून सत्तापालट करण्याचा या सरकार वापर करतात. आमचा सहकारी पक्ष सोडून गेला. अमरसिंह पंडितांनी सांगितले, पवार साहेबांचे वय झाले आपल्याला आपल्या भवितव्याचा विचार केला पाहिजे. तुम्ही माझे वय झाले म्हणता, तुम्ही माझे काय बघितले आहे. अशा लोकांना सत्तेतून बाहेर काढण्याचे काम यापूर्वी आम्ही केले आहे. आम्ही अनेकांचे पराभव केले आहेत. येथील तरुण पिढीच्या मदतीने आम्ही सत्तापालट येथे करून दाखवला आहे. सत्तेच्या बाजूने जायचे जा, आय़ुष्यातून तुम्ही ज्यांच्याकडून घेतले असेल तर त्याची जाणीव ठेवा, माणुसकी ठेवा, नाहीतर लोकं तुम्हाला जागा दाखवतील.