सोलापूर/शेखर गोतसुर्वे: दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. काँग्रेसकडून इच्छूक असणारे माजी आमदार दिलीप माने, धर्मराज काडादी,सुरेश हसापुरे यांचा पत्ता शिवसेना उद्धव ठाकरे गटाने कट केला आहे. महाविकास आघाडीतील ठाकरे गटातील माजी झेडपी सदस्य अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे . अमर पाटील हे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार रतिकांत पाटील यांचे चिरंजीव आहेत तसेच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राहिले आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाला मिळालेल्या यशानंतर त्यांनी दक्षिण विधानसभा मतदारसंघात आपली जोरदार मोर्चेबांधणी केली, त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला आहे त्यांनी ही उमेदवारी मिळण्यासाठी जोर लावला होता. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत हे जेव्हा सोलापूरला आले होते तेव्हाच त्यांनी घोषणा केली होती ती घोषणा खरी ठरली असून शेवटी अमर पाटील यांनी दक्षिणची उमेदवारी मिळवण्यात यश मिळवले आहे. मागील महिन्याभरापासून दक्षिण मध्ये तयारी केलेल्या सिद्धेश्वर परिवाराचे नेते धर्मराज काडादी यांची मात्र चांगलाच निराशा होण्याची झाली आहे.
दिलीप माने अपक्ष लढण्याच्या तयारीत
काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवली आहे. गेल्या अनेक दिवसापासून ते निवडणूक लढविण्याच्या तयारीत होते. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला मतदार संघ शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे गेल्याने अनेकांच्या भूमिका उंचावल्या आहेत.
कोगनूरे यांची सेफ खेळी
दक्षिण सोलापूरात महादेव कोगनुरे यांची सेफ खेळी झाली आहे. काँग्रेस मध्ये वर्णी लागत नसल्याने त्यांनी मनसेची कास धरून निवडणूक रिंगणात उभे आहेत. भाजपा आमदार सुभाष देशमुखांविरोधात अमर पाटील, महादेव कोगनूरे यांनी आव्हान उभे केले आहे