शहापूर : शहापूर (Shahapur) आणि मुरबाड (Murbad) तालुक्यांच्या हद्दीवर असलेल्या काळू नदीच्या (Kalu River) पुलाजवळ पात्रात मांसाचे तुकडे (Meat Pieces) आढळून आले आहेत. त्यामुळे दहिवली ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे (The health of Dahivali villagers is in danger). तसेच, यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणत दुर्गंधी पसरली आहे. नदीच्या मुख्य पात्रात हे तुकडे अज्ञाताने टाकल्याने जवळच असलेल्या दहिवली गावाच्या पाणी योजनेच्या जॅकवेलपर्यंत मांसाचे तुकडे वाहत गेले आहेत. या पाणी योजनेवर दहिवली गाव, आदिवासीवाडी-पाडे अवलंबून असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हे तुकडे लवकरात लवकर काढले नाहीत तर पाणीप्रश्न गंभीर होऊ शकतो.
काळू नदी परिसरातील भागदल, कळगाव, दहिवली, आदिवासी पाडे यांनी दक्षता घेण्याच्या आवाहन संबंधित सरकारी यंत्रणेकडून करण्यात आले आहे. या प्रसंगी प्रशासनाला माहिती मिळताच संप असतानाही आरोग्याच्या दृष्टीने संवेदनशीलता प्रसंगावधान राखून तलाठी पी. व्ही. जाधव, ग्रामसेवक आर. टी. इसामे यांनी तत्काळ उपस्थित राहून ग्रामस्थांच्या सहकार्याने पंचनामा केला. तसेच, अहवाल तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना सादर करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत स्तरावरून नदी पात्र स्वच्छ करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यावेळी ग्रुप ग्रामपंचायत दहिवलीच्या सरपंच कुसुम वाघ, सदस्य दत्तात्रय पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष कृष्णा पाटील, पोलीस पाटील सुनील भवार, ग्रामस्थ मोहन पाटील, केशव भाकरे उपस्थित होते.
[read_also content=”मोठी बातमी! नवी मुंबईत पुन्हा एकदा थरथराट, नेरूळमध्ये बांधकाम व्यवसायिकावर गोळी झाडून हत्या; व्यक्त केला जातोय ‘हा’ संशय https://www.navarashtra.com/crime/big-news-builder-savji-patel-imperia-group-shot-dead-in-nerul-navi-mumbai-police-crime-nrvb-376357.html”]
ग्रामपंचायत कर्मचारी आणि आशा वर्कर यांनी गावात पिण्याच्या पाण्यासंदर्भात जनजागृती केली. सदर पूल गावांपासून दूर असल्याने यापूर्वीदेखील शस्त्रांचे काही निकामी भाग या ठिकाणी मिळून आले होते. तर, कधी मुदत संपून गेलेले शितपेय, मसाले आढळून आले होते. पोलीस प्रशासनाने याची दाखल घेऊन योग्य कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान शहापूर पंचायत समिती गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे, तालुका पाणीपुरवठा अधिकारी जाधव माजी पंचायत समिती सदस्य पद्माकर वेखंडे, किन्हवलीचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र आव्हाड, शेंद्रूण आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी रुपाली शेडगे यांनी प्रशासकीय पातळीवर तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.
[read_also content=”रसिकांना पर्वणी! जहांगीर कला दालनात चित्रकार अनुराधा ठाकूर यांच्या चित्रांचे प्रदर्शन https://www.navarashtra.com/maharashtra/exhibition-of-paintings-by-painter-anuradha-thakur-at-jahangir-art-gallery-kalaghoda-mumbai-nrvb-376337.html”]