
लासलगाव– काळजाचा थरकाप उडविणारी एक दुर्घटना समोर येत आहे, या घटना ऐकून तुमच्या देखील हृदयाचा ठाव घेतल्याशिवाय राहणार नाही. लासलगा रेल्वे स्थानकाजवळ कामगार करत होते अन्…क्षणात होत्याचे नव्हते झाले. सोमवारी सकाळी लासलगावमधून (Lasalgaon) एक मोठी दुर्घटना समोर येत आहे, लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ (Railway Stations) रेल्वे इलेक्ट्रिक लाईनचे काम करणाऱ्या टॉवर गाडीने रुळावरच काम करणाऱ्या 4 कर्मचाऱ्यांना चिरडल्याची भीषण दुर्घटना (Accident) घडली आहे. त्यामुळं रेल्वे चालकाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत असून, यामुळं उद्रेक होत असून, कामगारांनी तसेच नातेवाईकांनी रेल रोको केला जात आहे.
कशामुळं घडला अपघात?
रेल्वे लाईनची काम करणारी दोन डब्यांची रेल्वे टॉवर ही लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ सकाळी सहा वाजता उभी होती. या टॉवर गाडीला लासलगावहून पुन्हा उगावच्या दिशेने काम करण्यासाठी जायचे होते. रेल्वे पोल नंबर 230 /231 च्या दरम्यान या गाडीला काम करायचे होते. या ठिकाणी रेल्वेचे ट्रॅकमेन कामासाठी हजर होते. त्यांचे काम सुरू होते. मात्र, टॉवर गाडी ही डाऊनलाईननेच उगाव दिशेकडे गेल्याने या कर्मचाऱ्यांना काही समजायच्या आत गाडीने त्यांना चिरडले. त्यामुळे चौघे कर्मचारी जागीच मृत्युमुखी पडले.
मृतांची नावे आलेत समोर…
संतोष भाऊराव केदारे (वय 38 वर्षे), दिनेश सहादु दराडे (वय 35 वर्षे), कृष्णा आत्मराम अहिरे (वय 40 वर्षे), संतोष सुखदेव शिरसाठ (वय 38 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. हे सर्व कर्मचारी ट्रॅक मेंटनर या पदावर काम करत होते.
चारही कर्मचारी जागेवरच ठार
आज सकाळी 6 वाजेच्या दरम्यान हे कर्मचारी रेल्वे ट्रकवर काम करत होते, चालकाच्या बेसावधमुळं हे बळी गेल्याची भावना नातवाईकांनी व्यक्त केली आहे, या घटनेत चारही कर्मचारी जागेवरच ठार झाले. कर्मचाऱ्यांना रेल्वेने उडवल्याने संतप्त झालेल्या चतुर्थ श्रेणी रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वेच्या चालकावर लासलगाव रेल्वे स्थानकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, लासलगाव पोलिसांनी रेल्वे चालकाला सुरक्षितपणे दुसऱ्या ठिकाणी हलवले. यामुळं पुढील अनर्थ टळला आहे. पण चालकाविरोधात लोकांकडून संताप व्यक्त होत आहे.
रेल रोको…
दरम्यान, या अपघातानंतर रेल्वेचे ट्रॅकमेनकडून तसेच चुतुर्थ श्रेणीतील कामगारांकडून व मृत्यूंच्या नातेवाईकांकडून रेले रोको करण्यात येत आहे. चालकाविरोधात लोकांमध्ये संताप असून, चालकाला मारहाण देखील यांच्याकडून झाली. लोकांमध्य उद्रेक असून, सध्या रेल रोको करण्यात येत आहे.