• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Sudhir Mungantiwar Present For Bombay Art Society Exhibition Nrsr

महाराष्ट्रातील कलाकारांच्या कलाकृतीच्या विक्रीसाठी पोर्टलची होणार निर्मिती, बॉम्बे आर्ट सोसायटीच्या कला प्रदर्शनात सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

खास महाराष्ट्रातील कलाकारांसाठी एक पोर्टल तयार करणार आहोत जे त्यांच्या कलाकृती विक्रीसाठी ठेवू शकतात व तसेच यात जगभरातील लोक प्रवेश करू शकतात, अशी घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

  • By साधना
Updated On: Feb 08, 2023 | 05:48 PM
sudhir mungantiwar at art exhibition
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई:‘बॉम्बे आर्ट सोसायटी’च्या (Bombay Art Society) 131 व्या ‘अखिल भारतीय वार्षिक कला प्रदर्शनाला (Art Exhibition)  07 फेब्रुवारी 2023 रोजी सुरुवात झाली असून. प्रदर्शनाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), डॉ. सरयू दोशी, कला इतिहासकार व राष्ट्रीय आधुनिक कलादालनाच्या माजी चेअरमन यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, “देव हा परम कलाकार असतो आणि जेव्हा आपण कलाकारांनी तयार केलेली कला पाहतो तेव्हा ती आपल्याला देवाच्या जवळ आणते. महाराष्ट्र हा संस्‍कृतीचा खजिना असून तो 10 व्या क्रमांकावर येतो. जहांगीर आर्ट गॅलरी सोबत आणि पूल देशपांडे महाराष्ट्र कला अकॅडमी हे कलाकारांसाठी नाममात्र दरात त्यांच्या कलाकृतीचे प्रदर्शन करण्यासाठी खुले करू. खास महाराष्ट्रातील कलाकारांसाठी एक पोर्टल तयार करणार आहोत जे त्यांच्या कलाकृती विक्रीसाठी ठेवू शकतात व तसेच यात जगभरातील लोक प्रवेश करू शकतात”.

बॉम्बे आर्टसोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील म्हणतात “131 व्या वार्षिक कला प्रदर्शनाला देशभरातून 2500 प्रवेशिका मिळाल्याने मी आनंदी आहे. विविध कला प्रकारातील 48 अंतिम स्पर्धकांची निवड करून ज्युरींनी प्रशंसनीय काम केले. बॉम्बे आर्ट सोसायटी दिग्गज कलाकारांना पुरस्कार देत असते. महाराष्ट्र निसर्ग कला शैली सुरू करणाऱ्या प्रा.जी.एस. माजगावकर यांचा यंदा आम्ही गौरव करत आहोत”.

या वर्षी सोसायटीच्या वार्षिक प्रदर्शनासाठी दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, गुजरात, आसाम, अशा देशभरातील बऱ्याच राज्यातून एकूण 2500 प्रवेशिका मिळाल्या असून हे प्रदर्शन खरोखर आपल्या देशातील कलेचे, प्रचलित कलाप्रवाहांचे प्रतिबिंब आहे, अशी माहिती बॉम्बे आर्ट सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी दिली.

या प्रसंगी, नामवंत चित्रकार प्रा. जी. एस माजगावंकर यांना या वर्षाच्या ‘रूपधर जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.चित्रकार किशोर इंगळे यांना ‘गव्हर्नर अवार्ड’ तर शिल्पकार सिद्धेश ठाकूर यांना ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’चे गोल्ड मेडल या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी देण्यात आले. या वर्षी चित्रकार मोनिका घुळे यांना ‘बेंद्रे-हुसेन शिष्यवृत्ती’, ‘शिल्पकार स्वप्नील गोडसे यांना संगीता जिंदाल शिष्यवृत्ती’ तर आंध्र प्रदेशचे कंदुला प्रदीप कुमार व उस्मानाबादचे मदन पवार यांना ‘संध्या मिश्रा शिष्यवृत्ती’ विभागून देण्यात आली. इतर 48 पारितोषिके देखील प्रदर्शनात प्रदान करण्यात आली.

या प्रदर्शनात देशभरातून चित्रकृती, शिल्पकृती, छायाचित्रे अशा विविध कलाप्रकारांमधील 2500 प्रवेशिका आल्या आहेत. दृषकला क्षेत्रातील तज्ञ, कलासमीक्षक, कला इतिहासकार अशा मान्यवरांचा समावेश असलेल्या निवड समितीद्वारे सदर कलाकृतींमधून 189 कलाकृती या वर्षी निवडल्या असून त्या सदर प्रदर्शनात पाहता येतील. 189कलाकृतींमधून, जवळपास सहा लाखापेक्षा जास्त रकमेची एकूण 48 विविध पारितोषिके, शिष्यवृत्ती आणि कलाक्षेत्रातील महत्वाचे समजले जाणारे पुरस्कार 7 फेब्रुवारीला जहांगीर कलादालनात प्रदान करण्यात आले.

7 ते 13 फेब्रुवारी 2023 दरम्यान कलारसिकांना हे प्रदर्शन पाहता येईल. त्यानंतर 16 ते 28 फेब्रुवारी 2023 दरम्यान प्रदर्शनातील निवडक कलाकृती ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’च्या वांद्रे येथील कलासंकुलात देखील प्रदर्शित केल्या जातील.

Web Title: Sudhir mungantiwar present for bombay art society exhibition nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2023 | 05:45 PM

Topics:  

  • Art Exhibition
  • Marathi News
  • Mumbai
  • Sudhir Mungantiwar
  • Sudhir Mungantiwar news

संबंधित बातम्या

२३ गावांतील ३० वर्षे जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारकडून वाढीव एफएसआय मंजूर
1

२३ गावांतील ३० वर्षे जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारकडून वाढीव एफएसआय मंजूर

‘गोंधळ’चे कोट्यवधींचे OTT डील? दिग्दर्शकाने एकाच दिवशी खरेदी केल्या ४ आलिशान गाड्या
2

‘गोंधळ’चे कोट्यवधींचे OTT डील? दिग्दर्शकाने एकाच दिवशी खरेदी केल्या ४ आलिशान गाड्या

‘या’ कंपनीच्या तब्बल 6.42 लाख SUV मध्ये आली खराबी; आता रिकॉल जारी, नेमकं घडलं काय? जाणून घ्या
3

‘या’ कंपनीच्या तब्बल 6.42 लाख SUV मध्ये आली खराबी; आता रिकॉल जारी, नेमकं घडलं काय? जाणून घ्या

Mumbai Metro 2B : मेट्रो २बी प्रकल्पाला गती! बीकेसी आणि कुर्ला प्रवाशांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका
4

Mumbai Metro 2B : मेट्रो २बी प्रकल्पाला गती! बीकेसी आणि कुर्ला प्रवाशांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका

ताज्या बातम्या

पुढे वाचा
१७८ कोटींच्या आरोपांचा ‘नाट्यमय’ शेवट!, “चुकीची माहिती…”; संजय राऊतांनी अखेर स्पष्टच सांगितलं!

१७८ कोटींच्या आरोपांचा ‘नाट्यमय’ शेवट!, “चुकीची माहिती…”; संजय राऊतांनी अखेर स्पष्टच सांगितलं!

Feb 22, 2026 | 01:37 PM
ना वर्ग, ना फळा…! भररस्त्यात रंगली चिमुकल्यांची शाळा;  गुरुजींच्या धडपडीला नेटकऱ्यांचा सलाम, Video Viral

ना वर्ग, ना फळा…! भररस्त्यात रंगली चिमुकल्यांची शाळा; गुरुजींच्या धडपडीला नेटकऱ्यांचा सलाम, Video Viral

Feb 22, 2026 | 01:31 PM
तुला खूप माज आलाय म्हणत तरुणावर हल्ला; लाकडी काठीने अन् लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

तुला खूप माज आलाय म्हणत तरुणावर हल्ला; लाकडी काठीने अन् लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

Feb 22, 2026 | 01:28 PM
Trade War : 50% टॅरिफमागचं कारण रशियाचं तेल नव्हतंच? PM मोदींचा ‘तो’ एक निर्णय आणि Trumpने भारतावर उगवला सूड

Trade War : 50% टॅरिफमागचं कारण रशियाचं तेल नव्हतंच? PM मोदींचा ‘तो’ एक निर्णय आणि Trumpने भारतावर उगवला सूड

Feb 22, 2026 | 01:26 PM
Solapur Crime: हसू झालंय माझं…हातावर लिहिली वेदना आणि…; २२ वर्षीय विवाहितेने संपवले आयुष्य

Solapur Crime: हसू झालंय माझं…हातावर लिहिली वेदना आणि…; २२ वर्षीय विवाहितेने संपवले आयुष्य

Feb 22, 2026 | 01:23 PM
छत्रपती संभाजीनगरच्या वैजापुरातील 105 ग्रामपंचायतींची मुदत संपली; गावागावांत आखाडे रंगायला सुरुवात

छत्रपती संभाजीनगरच्या वैजापुरातील 105 ग्रामपंचायतींची मुदत संपली; गावागावांत आखाडे रंगायला सुरुवात

Feb 22, 2026 | 01:23 PM
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आर्यन खानचा सन्मान; ‘द बॅड्***स ऑफ बॉलीवूड’साठी बेस्ट डेब्यू डायरेक्टर पुर

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आर्यन खानचा सन्मान; ‘द बॅड्***स ऑफ बॉलीवूड’साठी बेस्ट डेब्यू डायरेक्टर पुर

Feb 22, 2026 | 01:06 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

Feb 21, 2026 | 03:54 PM
KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

Feb 21, 2026 | 03:51 PM
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.