औरंगाबाद : १ मे ला औरंगाबाद शहरात मनसे प्रमुख राज ठाकरे सभा यांची सभा होणार आहे. याचबरोबर राज ठाकरे यांच्या आदेशाने औरंगाबाद शहरातील विविध प्रभागामध्ये महाआरतीचे आयोजन करण्यात आले असून आम्ही लवकरच औरंगाबाद शहरातील विविध वाट मध्ये जाऊन महाआरती घेणार. अशी माहिती मनसेचे शहराध्यक्ष सुमित खांबेकर यांनी दिली. शहरातील सुभेदारी विश्राम गृह इथे मनसेची बैठक संपन्न झाली बैठकीनंतर त्यांनी माहिती दिली.
राज ठाकरे यांच्या सभेला हिंदुत्ववादी संघटनेने पाठिंबा दिला असून मात्र शहरातील काही संघटनेने विरोध दर्शविला आहे. मात्र कोणी कितीही विरोध असला तरी राज ठाकरे यांची औरंगाबाद येथील सभा होणारच असल्याचं शहराध्यक्ष सुमित खांबेकर म्हणाले.
[read_also content=”कुमार विश्वास यांच्या घरी पंजाब पोलिस : पुराव्यासह २६ एप्रिलला पोलिस ठाण्यात बोलावले; केजरीवालांवर केला होता खलिस्तान समर्थक असल्याचा आरोप https://www.navarashtra.com/india/punjab-police-at-kumar-vishwass-house-summoned-to-police-station-on-april-26-with-evidence-kejriwal-was-accused-of-pro-khalistan-271219.html”]
तसेच या सभेसाठी मनसेच्या वतीने तयारी सुरू करण्यात आली असून प्रशासनाच्या वतीने विविध परवानग्या घेण्यात आल्या आहे. तसेच पोलिस प्रशासनाच्या परवानगीसाठी अर्ज दिल्याचीही माहिती यावेळी देण्यात आली. लवकरच आम्हाला परवानगी मिळेल आणि राज ठाकरे यांची एक मी रोजी होणारी सभा भव्यदिव्य स्वरूपात होईल असेही ते म्हणाले.
[read_also content=”राज ठाकरे यांची भाषा गुंडगिरीची, डोंगरगावातील बौद्ध मेळाव्यात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे टीकास्त्र https://www.navarashtra.com/maharashtra/raj-thackerays-language-of-gundgiri-union-minister-of-state-ramdas-athavales-tikastra-nraa-271209.html”]