मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शुक्रवारी दाखल करण्यात आले आहे. प्रतिभा पवार यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असून, शरद पवारदेखील रुग्णालयात पोहोचले आहेत. प्रतिभा पवार यांच्यावर नेमकी कोणती शस्त्रक्रिया होणार आहे हे अद्याप समजू शकले नाही.
शरद पवारांचा महाराष्ट्रभर दौरा
दरम्यान, राज्यातील राजकारणात मोठमोठ्या घडामोडी घडत असताना, शरद पवार यांचा काही दिवस महाराष्ट्रभर दौरा सुरू होता. अजित पवार यांनी बंड करून राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांना सोबत घेऊन भाजप सरकारमध्ये सामील झाल्याने राष्ट्रवादीत दोन गट पडल्याचे सिद्ध झाले.
शरद पवार ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये
दरम्यान, या सर्व घटनेवर शरद पवारांनी आक्रमक पवित्रा घेत लोकांमध्ये जाण्याचा निर्णय घेत, दमदार दौऱ्याची सुरुवात केली होती. परंतु, त्यांच्या अचानक हॉस्पिटलमध्ये येण्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. मुळात शरद पवारांचे वयसुद्धा अधिक असल्याने प्रकृती अस्वस्थामुळे ते हॉस्पिटलमध्ये पोहचले का, असा प्रश्न पडला होता. परंतु, त्यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार यांच्यावर शस्त्रक्रियेकरिता शरद पवार यांनी ब्रीच कॅंडी हॉस्पिटल गाठले आहे.
शरद पवार महाराष्ट्रात पक्षबांधणीसाठी झंझावती दौरे
शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील उभी मोठी फूट पडली आहे. शिवसेना पक्षफुटीनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजप-शिवसेनेसोबत जात सत्तेत सहभागी होत, अजित पवार यांनी रविवारी उपमुख्यमंत्रिपदाची (DCM) शपथ घेतली आहे. दरम्यान, तर दुसरीकडे राष्ट्रवादी पक्ष व निवडणूक चिन्हावर अजित पवार गटाने दावा केला आहे. या सर्व धरतीवर आज शरद पवार (Sharad Pawar) यांनी कराड येथील प्रीतीसंगम या स्मृतीस्थळावर जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या पवित्र स्मृतीचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना आपण पुन्हा उभारी घेऊ, असा आत्मविश्वास कार्यकर्त्यांना दिला.