
taloja midc
नवी मुंबई : शहरात मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण (Air Pollution) करणाऱ्या कारखान्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (Maharashtra Pollution Control Board) कारवाई केली आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीमधील १० कारखान्यांना इशारा (MPCB Notice To 10 Factories Of Taloja MIDC) देण्यात आला आहे.
[read_also content=”दिलासादायक – शिवभोजन थाळी केंद्रांच्या रखडलेल्या ४५ कोटींच्या अनुदानाच्या निधीला वित्त विभागाची मंजुरी https://www.navarashtra.com/maharashtra/finance-departments-approval-to-give-45-crores-for-shivbhojan-thali-scheme-nrsr-225781.html”]
तळोजा भागामधील नगरसेवक अरविंद म्हात्रे ( Complaint By Corporator Arvind Mhatre) यांनी प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांविरोधात तक्रार केली होती. कारखान्यांमधून सोडण्यात आलेली रसायने आणि वायू यामुळे होत असलेल्या प्रदूषणामुळे खारघर आणि तळोजा भागातील रहिवाशांना आरोग्याच्या समस्या जाणवत असल्याचे अरविंद म्हात्रे यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटले होते. त्यानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी रात्रीच्या दरम्यान औद्योगिक वसाहतीत पाहणी दौरा केला. या दौऱ्या दरम्यान तीन कारखाने बंद करण्यात आलेत तर एका कारखान्याला प्रस्तावित आणि सहा कारखान्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.