• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • The Intensity Of Rains Has Decreased In Some Parts Of Maharashtra

राज्यातील काही भागांत पावसाचा जोर मंदावला; पुरंदर तालुक्यात पिकांचे पंचनामे सुरू

खरीप हंगाम तोंडावर असताना आणि उन्हाळी शेतीतून बऱ्यापैकी उत्पन्न अपेक्षित असताना मागील आठवडाभर पावसाने चारा पिके आडवी झाली आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 01, 2025 | 01:01 PM
पावसाचा जोर मंदावला,;आता नुकसानीच्या पंचनाम्यांना वेग.

पावसाचा जोर मंदावला,;आता नुकसानीच्या पंचनाम्यांना वेग.

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नीरा : गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेला मान्सूनपूर्व पाऊस काहीसा कमी झाला. पुरंदर तालुक्यातील अति पावसाच्या भागासह दुष्काळी भागाला पावसाने चांगलेच झोडपून काढले होते. जनजीवन ठप्प झाले होते. नंतर, सायंकाळपासून सासवड, जेजुरी, वाल्हे, परिंचे, नीरा या भागात उघडीप दिली आहे. या पूर्व मोसमी पावसाने शेतकऱ्यांच्या पीकांचे झालेल्या नुकसानीची पंचनामे आता महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेगात सुरू केले आहेत.

पुरंदर तालुक्यातील शेतकरी व गोपालक उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात चारा पिके करतात. परंतु अवकाळी पावसाची यंदा मोठी झळ या चारा उत्पादक शेतकऱ्यांना बसली आहे. आठवड्याभरात कोसळलेल्या धुवांधार पावसाने हाताशी आलेले चार पिक शेतकऱ्यांना गमवावे लागले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मका, व्हंडी, कडवळ, घास हे पिक नष्ट झाल्यामुळे त्यांच्या जनावरांच्या पुढील चार महिन्यांसाठी चाऱ्याची सोय नव्याने करावी लागणार आहे.

दरम्यान, खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना आणि उन्हाळी शेतीतून बऱ्यापैकी उत्पन्न अपेक्षित असताना मागील आठवडाभर पावसाने चारा पिके आडवी झाली आहेत. मागील आठवड्यात झालेल्या पावसाच्या नोंदीमध्ये पुरंदर तालुक्यात २७६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, सर्वच धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

सकाळी झाले सूर्यदर्शन 

आठवड्याभरानंतर बुधवारी सकाळी सूर्यदर्शन झाले होते. संध्याकाळी थोडावेळ पावसाच्या सरी कोसळल्यानंतर तालुक्यात पावसाने उघडीप दिल्याचे चित्र आहे. गेल्या आठ दिवसात पुरंदर किल्ला परिसरातील या अतिपावसाच्या गावांसह दुष्काळी राख, नावळी, कर्नलवाडी, वाल्हे, वाघदरवाडी, पिंगोरी तसेच दक्षिण पूर्व भागातील गावांना चांगलेच झोडपून काढले. त्यामध्ये रस्ते, नाले, ओढे, नद्या तुडुंब भरून वाहू लागले होते. तसेच शेतात पाण्याचे तळे निर्माण झाले होते.

अनेक शेतीपिकांचे मोठे नुकसान

पुरंदर तालुक्यात अवकाळी पावसाने कांदा, टोमॅटो, काकडी, भुईमूग, ज्वारी, बाजरी तरकारी पिकांचे नुकसान झाले. भुईमुगाच्या शेंगांना मोड आले. तरकारी पिके भुईसपाट झाली. तसेच जोरदार वाऱ्यामुळे आंब्याची फळे मोठ्या प्रमाणावर पडली. पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. याबाबत तालुका कृषी अधिकारी सुरज जाधव म्हणाले, ‘‘सर्व कृषी पर्यवेक्षक व तलाठी यांना त्यांच्या मंडलातील पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क करून झालेले नुकसान दाखवण्याचे सहकार्य करावे.’’

Web Title: The intensity of rains has decreased in some parts of maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2025 | 01:01 PM

Topics:  

  • baramati news
  • Rain News

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Ahilyanagar News: पाथर्डीच्या शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना झाला धन लाभ! संत्र्याला मिळाला ‘इतक्या’ रुपयांचा उंचाकी भाव

Ahilyanagar News: पाथर्डीच्या शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना झाला धन लाभ! संत्र्याला मिळाला ‘इतक्या’ रुपयांचा उंचाकी भाव

Jan 03, 2026 | 08:58 PM
IPO मध्ये करायची गुंतवणूक? मग हा मंत्र घ्या… कमाई होईल अशी की व्हाल लाखोंची धनी

IPO मध्ये करायची गुंतवणूक? मग हा मंत्र घ्या… कमाई होईल अशी की व्हाल लाखोंची धनी

Jan 03, 2026 | 08:35 PM
अमेरिकेने ‘या’ देशाच्या प्रमुखांना उचललं? भीषण Air Strike नं हादरवलं; लवकरच होणार मोठा गेम

अमेरिकेने ‘या’ देशाच्या प्रमुखांना उचललं? भीषण Air Strike नं हादरवलं; लवकरच होणार मोठा गेम

Jan 03, 2026 | 08:32 PM
T20 विश्वचषकात शतक करणारा एकमेव भारतीय फलंदाज, रोहित आणि कोहली सारख्या दिग्गजांनाही ही कामगिरी करता आलेली नाही…

T20 विश्वचषकात शतक करणारा एकमेव भारतीय फलंदाज, रोहित आणि कोहली सारख्या दिग्गजांनाही ही कामगिरी करता आलेली नाही…

Jan 03, 2026 | 08:30 PM
भारताचा स्टार क्रिकेटर तरीही न्यूझीलंडविरूद्ध टीमबाहेर, Hardik Pandya ला का नाही निवडले? BCCI ने सांगितले कारण

भारताचा स्टार क्रिकेटर तरीही न्यूझीलंडविरूद्ध टीमबाहेर, Hardik Pandya ला का नाही निवडले? BCCI ने सांगितले कारण

Jan 03, 2026 | 08:27 PM
कालांतराने लोकरीच्या कपड्यांवरील धागे निघायला लागलेत? मग या ट्रिकचा वापर करा; जुना स्वेटर दिसेल नव्यासारखा

कालांतराने लोकरीच्या कपड्यांवरील धागे निघायला लागलेत? मग या ट्रिकचा वापर करा; जुना स्वेटर दिसेल नव्यासारखा

Jan 03, 2026 | 08:15 PM
Ahilyanagar News: माजी आमदाराच्या कुटुंबावर हल्ला, सात जणांविरोधात गुन्हा दाखल

Ahilyanagar News: माजी आमदाराच्या कुटुंबावर हल्ला, सात जणांविरोधात गुन्हा दाखल

Jan 03, 2026 | 08:09 PM

व्हिडिओ

पुढे बघा
‘सरनाईक झाले भाईजान’-भाजप नेते नरेंद्र मेहता यांचा शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल

‘सरनाईक झाले भाईजान’-भाजप नेते नरेंद्र मेहता यांचा शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल

Jan 03, 2026 | 07:50 PM
Akola : वडील चौकीदार आई करते धुणीभांडी वीज बिल वाटणाऱ्या मंगेश झिनेला मिळाली उमेदवारी

Akola : वडील चौकीदार आई करते धुणीभांडी वीज बिल वाटणाऱ्या मंगेश झिनेला मिळाली उमेदवारी

Jan 03, 2026 | 07:31 PM
Panvel : विश्वासाने दिलेली उमेदवारी मागे घेणे शोकांतिका आहे – बाळाराम पाटील

Panvel : विश्वासाने दिलेली उमेदवारी मागे घेणे शोकांतिका आहे – बाळाराम पाटील

Jan 03, 2026 | 07:24 PM
Kolhapur Satej Patil : “बच्चा कोण आणि शेर कोण हे इचलकरंजीची जनता निकालातून दाखवेल” – राहुल आवाडे

Kolhapur Satej Patil : “बच्चा कोण आणि शेर कोण हे इचलकरंजीची जनता निकालातून दाखवेल” – राहुल आवाडे

Jan 03, 2026 | 07:12 PM
Navi Mumbai :  पनवेलमध्ये भाजप उमेदवाराची माघार, अपक्ष उमेदवार स्नेहल ढमाले पाटील विजयी

Navi Mumbai : पनवेलमध्ये भाजप उमेदवाराची माघार, अपक्ष उमेदवार स्नेहल ढमाले पाटील विजयी

Jan 03, 2026 | 05:39 PM
Beed : श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर संत वामन भाऊंच्या उत्सवाला सुरुवात

Beed : श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर संत वामन भाऊंच्या उत्सवाला सुरुवात

Jan 03, 2026 | 05:33 PM
Nanded Election : शहराचा विकास झालाच नाही, तत्कालीन सत्ताधा-यांनी विकासाच्या नावाखाली मलिदा लाटला

Nanded Election : शहराचा विकास झालाच नाही, तत्कालीन सत्ताधा-यांनी विकासाच्या नावाखाली मलिदा लाटला

Jan 03, 2026 | 04:41 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.