उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग सोसायटी येथील निवासस्थान परिसरात भाजप युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वेषात आंदोलनस्थळी उपस्थित होते.
बारामती येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने बारामती नगरपरिषद निवडणुकीमध्ये तीन उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याचा दिलेला निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने रद्द ठरविला आहे.
वाढत्या थंडीमुळे शहरासह ग्रामीण भागातही नागरिकांना हुडहुडी भरवत आहे. शनिवारी सकाळी नोंदवण्यात आलेले तापमान मागील आठवड्याच्या तुलनेत ४ ते ५ अंशांनी खाली आल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
निरावागज परिसरातून मंगळवारपासून एक ७५ वर्षीय वृद्ध महिला अचानक बेपत्ता झाली आहे. शेतात फिरत असताना, अचानक ही महिला गायब झाल्याने या वृद्ध महिलेचे कुटुंबीय मोठ्या प्रमाणावर भयभीत झाले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची विकासाची घौडदौड चालू असून, गाळप हंगाम २०२५-२६ हा देखील विक्रमी व यशस्वीरित्या पार पडेल, अशा प्रकारचे नियोजन कारखाना व्यवस्थापनाने केलेले आहे.
प्रभाग क्रमांक 15 कडे बारामतीकरांचे विशेष लक्ष लागले आहे. कारण या प्रभागात माजी नगराध्यक्ष सुनील पोटे यांचे चिरंजीव यशपाल पोटे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
१० नोव्हेंबर पासून १७ नोव्हेंबर पर्यंत नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. आता केवळ दोनच दिवस शिल्लक असून रविवारीही अर्ज दाखल करण्याच्या निवडणूक आयोगाने सूचना दिल्या आहेत.
बारामती नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी राष्ट्रवादी कडून नगराध्यक्ष पदाचा संभाव्य उमेदवार कोण? याबाबत विविध तर्क वितर्क काढण्यात येत आहेत.
कंपनीच्या कर्मचाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत महिन्याला लाख रुपयांची खंडणीची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच धमकी देत कंपनीतील कर्मचाऱ्यांनाही मारहाण केली आहे.
आरक्षणानुसार, अनुसूचित जाती, मागासवर्गीय आणि सर्वसाधारण अशा सर्व गटांमध्ये महिलांना समान संधी देण्यात आली आहे. यंदाच्या सोडतीत सामाजिक न्यायाचे उत्तम संतुलन राखण्यात आले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
बारामती शहर हे औद्योगिक, शैक्षणिक व कृषी दृष्ट्या महत्त्वाचे ठरत असले तरी गेल्या काही वर्षांत शहरातील वाढती लोकसंख्या आणि त्यानुसार वाढलेली वाहनसंख्या ही मोठी समस्या ठरत आहे.
बारामती शहराचा पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) लवकरच समावेश होणार असून या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला आहे.
शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार अर्जुन खोतकर यांच्यावर अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी सलग दोन दिवस खाटिक समाजाबद्दल आक्षेपार्ह विधाने केली होती.
आयच्या वापरासाठी ठिबक सिंचन आवश्यक आहे. हवामानात बदल होत असताना त्यावर मात करण्याची क्षमता या तंत्रज्ञानात आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
रक्षाबंधनासाठी बहिणीकडे जाऊन परतत असताना झालेल्या दुचाकी अपघातात अंबाजीचीवाडी (ता. पुरंदर) येथील गणेश बाळासो पवार (वय २४) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.