हजारो एकर पिकलेली पिके शेतातच जमीनदोस्त झाली. ताशी ४५ ते ५५ किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे ३.५ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रातील भात, कापूस आणि उसाच्या पिकांचे नुकसान झाले.
सरासरीपेक्षा १० टक्क्यांहून अधिक तूट असलेली वर्षे कोरडी, तर १० टक्क्यांहून अधिक पाऊस असलेली वर्षे ओल्या वर्षांच्या श्रेणीत ठेवण्यात आली आहेत. उर्वरित वर्षे सामान्य मानली आहेत.
२२ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत महाराष्ट्रासह पश्चिम किनारपट्टीच्या काही भागांत सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता दिसत आहे. विशेषतः २९ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या आठवड्यात कोकण आणि पश्चिम किनारपट्टीवरील…
उत्तराखंडच्या पिथोरगड जिल्ह्यात १४,५०० फूट उंचीवर असलेल्या आदि कैलास येथे शनिवारी हिमवृष्टी झाली. हिमवृष्टीमुळे कैलास पर्वताचे दर्शन होऊ शकले नाही, त्यामुळे भाविकांना निराश होऊन परतावे लागले.
कोकणात पावसाचा अंदाज असून, विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात हवामान काहीसे अस्थिर राहण्याची शक्यता आहे. गडचिरोलीमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
समुद्रातील वाऱ्यांचा वेग वाढल्याने मच्छीमार आणि शेतकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील लखनौसह अनेक जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाने…
नैऋत्य मोसमी पावसाने परतीचा प्रवास सुरू केला आहे. उत्तर-पश्चिम भारतातील काही भागांत सप्टेंबरअखेरपासून हवामान कोरडे होण्याची शक्यता आहे. मात्र, सक्रिय हवामान प्रणालींमुळे देशाच्या विविध भागांत पावसाचा जोर अधूनमधून कायम राहणार…
भूस्खलनामुळे केदारनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. दरड कोसळून एका मुलाचा मृत्यू झाला, तर मार्गावरील ढिगाऱ्याखाली १५०० हून अधिक यात्रेकरू अडकले होते, ज्यांना मोठ्या प्रयत्नांनी वाचवून गौरीकुंड येथे नेण्यात आले.
पावसाचे प्रमाण, पिकांची स्थिती, पाण्याची उपलब्धता आणि भौगोलिक परिस्थिती यांचा गावनिहाय व विभागनिहाय आढावा घेऊन जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागासाठी स्वतंत्र दुष्काळी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
श्री क्षेत्र भीमाशंकरजवळील कोंढवळ परिसरात बुधवारी(दि. २३) सायंकाळी साडेसातच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला आहे. सुमारे दोन ते अडीच तास झालेल्या अति मुसळधार पावसामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात वाऱ्याचा वेग हा 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने राहण्याची शक्यता आहे.
काही भागांत ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे आणि पावसाच्या काळात सुरक्षिततेची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
सुमारे एक ते दीड तास झालेल्या या जोरदार पावसामुळे ओढे, नाले वाहते झाले असून शेतात पाणी साचले आहे. या पावसामुळे कापूस, सोयाबीन, मका, बाजरी यासह फळबागांना मोठा फायदा होणार आहे.
एकीकडे पिंपरी-चिंचवड आणि मावळ पट्ट्यामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली असताना, पुणे शहरात मात्र केवळ हलक्या सरींवरच समाधान मानावे लागले. पुण्यातील बहुतांश भागांत पाऊस हुलकावणी देताना दिसला.
कोकण आणि गोव्यात २२ ते २७ सप्टेंबरदरम्यान पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात २२ आणि २३ सप्टेंबर, तर मराठवाड्यात २३ सप्टेंबर रोजी मध्यम ते व्यापक स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
दुष्काळ जाहीर करण्यासाठी विविध निकषांच्या आधारे परिस्थितीचे मूल्यांकन केले जाते. जिल्ह्यातील सध्याच्या परिस्थितीत २१ दिवसांपेक्षा अधिक पावसाच्या खंडाचा निकष स्पष्टपणे दिसून येत असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
एखाद्या गावात पाणीटंचाई जाहीर झाल्यानंतर थेट टँकर सुरू करण्याऐवजी जलसंधारण, पाणी स्रोतांचे बळकटीकरण आणि इतर तातडीच्या उपाययोजनांना प्राधान्य देण्याचे शासनाचे निर्देश आहेत.
लातूरमध्ये केवळ ५६ टक्के, तर धाराशिवमध्ये ७० टक्के पाऊस झाला आहे. पावसाच्या कमतरतेमुळे सोयाबीन, मूग, उडीद, कापूस आणि तूर ही पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत.
Dharashiv: पावसाने पाठ फिरवल्याने आता केवळ पावसाची प्रतीक्षा करण्यापेक्षा संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाला आतापासूनच नियोजन करावे लागणार आहे.