Megablock
मुंबई : मध्य रेल्वे (Central Railway) मुंबई विभागात (Mumbai Division) विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी (Repair And Maintainance Work) आपल्या उपनगरीय विभागांत (Suburban Areas) आज मेगा ब्लॉक (Mega Block) परीचालित करणार आहे. पश्चिम मार्गावरही पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे (Western Line Five Hours Jumbo Block Is Also There).
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई (CSMT, Mumbai) येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.१८ या वेळेत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. पुढे मुलुंड स्थानकावर धीम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि नियोजित आगमनापेक्षा १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचेल.
ठाणे (Thane) येथून सकाळी १०.५८ ते दुपारी ३.५९ या वेळेत अप धीम्या मार्गावरील लोकल मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकावर थांबतील. पुढे अप धीम्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील आणि नियोजित आगमनापेक्षा १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील.
पनवेल (Panvel) येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि
ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत पनवेल करीता जाणारी डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी भागात विशेष लोकल धावतील.
ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असतील.
ब्लॉक कालावधीत बेलापूर – खारकोपर आणि नेरुळ – खारकोपर दरम्यान लोकल ट्रेन वेळापत्रकानुसार धावतील.
मध्य रेल्वे मुंबई विभाग दि. २४.२.२०२३ /२५.२.२०२३ ते ३.३.२०२३ /४.३.२०२३ च्या मध्यरात्री वांगणी आणि नेरळ स्थानकांदरम्यान डाऊन लाईनमध्ये अभियांत्रिकी मशीन्स (BCM, Duomatic आणि DGS) च्या कामासाठी सकाळी ०१.५० ते ०४.५० पर्यंत (३ तास) विशेष ट्रॅफिक ब्लॉक परिचालित करणार आहे. तपशील खालीलप्रमाणे आहेतः
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.२४ वाजता सुटणारी कर्जत लोकल बदलापूर येथे शॉर्ट टर्मिनेट होईल.
कर्जत येथून ०२.३३ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल बदलापूर येथून सुटेल.
मध्य रेल्वे दि. २७.२.२०२३ पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई आणि ठाणे दरम्यानच्या रात्रीच्या ब्लॉकमुळे मुख्य मार्गावरील खालील उपनगरीय सेवा पुढील सल्ल्यापर्यंत रद्द करणार आहे. तपशील खालीलप्रमाणे आहेतः
1. सी-1 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 00.20 वाजता सुटणारी कुर्ला लोकल.
2. टी-1 लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 00.28 वाजता सुटणारी ठाणे लोकल
3. सी-3 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 00.31 वाजता सुटणारी कुर्ला लोकल.
4. DT-1 दादर येथून 00.29 वाजता सुटणारी ठाणे लोकल.
1. AN-32 आसनगाव येथून 22.10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीताची लोकल ठाण्यापर्यंत चालविण्यात येईल.
2. A-72 अंबरनाथ येथून 22.15 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीताची लोकल कुर्ल्यापर्यंत चालविण्यात येईल.
3. K-138 कल्याण येथून 22.56 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीताची लोकल कुर्ल्यापर्यंत चालविण्यात येईल.
4. DK-16 कल्याण येथून 23.11 वाजता सुटणारी दादर करीताची लोकल.
पश्चिम रेल्वेतर्फे सांताक्रुझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान सकाळी १०.०० ते ०३.०० वाजेपर्यंत पाच तासांचा जम्बो ब्लॉक (Jumbo Block) घेण्यात येईल. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, ब्लॉक कालावधीत, उपनगरीय सेवा सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर चालवल्या जातील. बोरिवलीच्या काही गाड्या गोरेगाव स्थानकापर्यंत धावतील. ब्लॉक दरम्यान काही उपनगरीय गाड्या रद्द राहतील. याबाबतची सविस्तर माहिती संबंधित स्टेशन मास्टर्सकडे उपलब्ध आहे.