Tractor crashes into bridge over Chandrabhaga river! The driver died on the spot and one was seriously injured
पथ्रोट : पुलावरुन ट्रॅक्टर खाली कोसळून (The tractor crashed down from the bridge ) एका ३२ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू (Unfortunate death ) झाला असून एक जण जखमी झाला आहे. निलेश तुळशिराम बनसोड (Nilesh Tulshiram Bansod ) (३२, रा. चंद्रपूर) असे मृतकाचे नाव असून अजय शंकर बहुराशी (रा. चंद्रपूर) असे जखमी युवकाचे नाव आहे. ही घटना रविवार, २६ जुने रोजी दुपारी २:३० वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे खल्लार परिसरात शोककळा पसरली आहे.
निलेश बनसोड व अजय बहुराशी हे शेतात ट्रॅक्टर घेऊन पंजी मारण्यासाठी जात होते. दरम्यान खल्लार अंजनगाव रोडवर (Khallar on Anjangaon Road ) चंद्रभागा नदीच्या (Chandrabhaga river ) मोठ्या पुलावरून ट्रॅक्टर पुलावरील कठडे तोडून चंद्रभागा नदी पात्रात कोसळला. यात चालक निलेश बनसोड याचा जागेवरच मृत्यू झाला. तर, अजयला जखमी अवस्थेत पुढील उपचारार्थ अमरावती येथे हलविण्यात आले. या घटनेची माहिती पसरताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.
या घटनेच्या माहितीवरून खल्लारचे ठाणेदार विनायक लंबे, दुय्यम ठाणेदार रामरतन चव्हान,पोलीस हवालदार शरद डाहाके, ज्ञानेश्वर सिडाम, शाकिर शेख यांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढून उत्तरीय तपासणी करीता दर्यापुरातील उपजिल्हा रुग्णालय (Sub-District Hospital at Daryapur ) येथे पाठविला. निलेश याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दिड वर्षाचा लहान मुलगा, भाऊ असा आप्त परिवार आहे.