मराठा आंदोलन : जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. मराठा आंदोलकांनी आता याचा तीव्र निषेध करीत, राज्यभर मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा बडगा उचलला आहे. अनेक राजकीय नेत्यांनी या गोष्टीचा तीव्र निषेध व्यक्त करीत, मुख्यमंत्र्यांसहीत, गृहमंत्र्यांना धारेवर धरले आहे. असे असताना राज्यातील प्रमुख नेत्यांनी जालन्यामध्ये जाऊन आंदोलकांची भेट घेतली आहे. आता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या गोष्टीवर सरकारला धारेवर धरत खोचक सवाल केला आहे.
युवा सेनेच्या बैठकीत कार्यकर्त्यांशी संवाद
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी युवा सेनेच्या बैठकीत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्जवर भाष्य केले. पोलिस दल इतके हिंसक कसे होऊ शकते? नक्कीच यामागे कोणाचा तरी हात असला पाहिजे. घरात घुसून महिलांना मारहाण करण्यात आली.
हा नुसता फार्स आहे
आता पुन्हा चौकशीचे आश्वासन दिले आहे. हा नुसता फार्स आहे. एक फुल, दोन हाफ यांना माहिती नाही का आंदोलन होणार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. मुंबईत इंडिया आघाडीची बैठक पार पडली. काल एक मेसेज आला होता. पक्ष चोरला, नाव चोरलं, पण ठाकरेंनी इंडिया एकत्र करून दाखवला. विरोधकांना टीका करू देत. त्यांच्या पोटात या आघाडीमुळे गोळा येत आहे, असेसुद्धा ठाकरे यांनी सांगितले. शनिवारी रात्री जालन्यात जाणार असल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी यावेळी दिली.
सरकार म्हणजे एक फूल, दोन हाफ
सरकार म्हणजे कोण? पाहिले तर एक फूल, दोन हाफ आहे. जालन्यात आंदोलकांवर लाठीमार झाला. कोणाच्याही आदेशाशिवाय असू होऊ शकत नाही. आता सखोल चौकशी करणार असे बोलत आहेत, पण आंदोलन स्थळी गेले नाहीत. कुठे आंदोलन सुरू आहे याची माहिती आधीच दिली जाते. मी स्वतः मुख्यमंत्री होतो तेव्हा ही माहिती मिळायची. एक फूल, दोन हाफ यांना माहिती नव्हते का आंदोलन होणार आहे, असा सवाल त्यांनी केला.
पोलीस आदेशाशिवाय कसे करू शकत नाहीत
काल आणि परवा जेव्हा बैठक सुरु होती. त्यावर बैठकीवर टीका करण्यात आली. इंडिया म्हणजे चिंदिया पण तुमचे चिंदी चिंदी झाले आहे ते बघा. मी बारसुला गेलो, त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. वारकऱ्यांवर लाठीचार्ज केला. काल मराठा आंदोलनावर लाठीचार्ज झाला. कोरोना काळात जे पोलीस धावून आले ते पोलीस आदेशाशिवाय कसे करू शकत नाहीत, असेसुद्धा ठाकरे यांनी सांगितले.
आदित्य L1 ने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी घेतले उड्डाण
आज आदित्य L1 हे सूर्याचा अभ्यास करण्यासाठी उड्डाण घेतले आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. यान सूर्यावर उतरणार नाही, नाहीतर कोणी तरी बोलेल सूर्यावर उतरणाऱ्या वैज्ञानिकांना शुभेच्छा, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी यावेळी केली.
Web Title: Uddhav thackerays question to govt they say one flower two halves were not aware of the movement nryb