vande bharat express
चिपळूण : कोकणवासियांसाठी (kokan) एक महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर येत आहे. कोकणी माणूस, चाकरमानी फक्त दोनच सणाला गावी जातो, एक म्हणजे होळी व गणपतीला. नुकतेच गणपतीला जाण्यासाठी रेल्वेचं तिकिट काही तासात फुल्ल झाले. तीन महिन्यांपूर्वी कोकणात जाण्यासाठी तिकिट बुक करावे लागते. मात्र काही तासातच तिकिट फुल्ल झाल्यानं कोकणी चाकरमान्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. ही घटना ताजी असताना, आता कोकणवासियांसाठी एक महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर येत आहे. वंदे भारत एक्सप्रेसला (Vande Bharat Express) अखेर मुहूर्त मिळाला असून, ३ जून म्हणजे शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Modi) हिरवा झेंडा दाखवणार आहेत. ५ जूनपासून ही गाडी प्रवाशांच्या नियमित सेवेसाठी दाखल होईल. यामुळे सगळ्यांचीच उत्सुकता लागून राहिलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसचा प्रवास आता कोकण रेल्वे मार्गावर अखेर आता सुरू होणार आहे. ही आठ डब्यांची गाडी उद्घाटनासाठी मडगाव येथे नुकतीच दाखल झाली.
कसे असणार वेळापत्रक?
दरम्यान, वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सकाळी ५.३५ वाजता
– मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सकाळी ५.३५ वाजता
– ठाणे ६.०५
– पनवेल ६.४०,
– खेड ८.४०
– रत्नागिरी १०.००,
यानंतर मडगाव दुपारी १.२५ पोहचेल अशी वेळ आहे
मडगाव येथून वंदे भारत एक्सप्रेस दुपारी २.३५ वाजता सुटेल.
कसा असणार परतीचा प्रवास…
परतीच्या प्रवासात रत्नागिरीत ५.३५ वेळ आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसला ही गाडी रात्री १०.३५ वाजता पोहोचेल. या गाडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे थांबा देण्यात आला आहे. मुंबईकडून मडगावकडे जाताना कणकवली येथे ही गाडी ११ वाजून २० मिनिटांनी पोहोचेल. मडगाव येथून सुटल्यावर मुंबईकडे जाताना कणकवली येथे ४ वाजून १० मिनिटांनी पोहोचेल. रायगड जिल्ह्यात रोहा व पनवेल येथे थांबा देण्यात आला आहे. मडगावकडून मुंबईच्या दिशेने जात असताना रोहा येथे रात्री ८ वाजून पाच मिनिटांनी पोहोचेल. पनवेल येथे ९ वाजून १८ मिनिटांनी पोहोचेल. त्यामुळं या रेल्वेमुळं कोकवासियांना दिलासा मिळणार आहे.