

वाशिम: हंगाम २०२६-२७मध्ये भारतीय कपास निगम लिमिटेडमार्फत किमान आधारभूत किंमत (एमएसपी) योजनेअंतर्गत कापूस खरेदी पारदर्शक आणि प्रभावीपणे पार पाडण्यासाठी वाशिम जिल्ह्यात एकूण ४ खरेदी केंद्रांच्या ठिकाणी कायमस्वरूपी 'स्थानिक निगराणी समिती' स्थापन करण्यात आली. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या मान्यतेने या समितीच्या स्थापनेचे आदेश जारी करण्यात आले. कपास किसान अॅप'द्वारे पूर्व नोंदणी आवश्यक आहे.
हमीदराने कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना पूर्व नोंदणी करण्यासाठी भारतीय कपास निगम लि. ने 'कपास किसान' मोबाइल अॅप्लिकेशन उपलब्ध करून दिले. अॅपद्वारे शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदी व कापूस लागवड क्षेत्राच्या तपशिलांची पडताळणी करण्यासाठी तालुकास्तरावरील सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांची 'नोडल अधिकारी' म्हणून नियुक्ती करण्यात आली. यामध्ये नियुक्त करण्यात आलेली ४ कापूस खरेदी केंद्रे १ अनसिंग ता. वाशिम, २. मंगरूळपीर, ३. कारंजा, ४ मानोरा असे स्थानिक निगराणी समिती आहे.
जिल्ह्यातील कोणताही शेतकरी कापूस खरेदीपासून वंचित राहू नये, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले.कार्य व जबाबदाऱ्या 'कपास किसान अॅप'द्वारे शेतकऱ्यांच्या नोंदणीमधील अडचणी सोडवणे व अॅपबाबत व्यापक प्रसिद्धी देणे, तालुक्यातील कापूस खरेदी प्रक्रियेवर प्रत्यक्ष देखरेख ठेवणे. शेतकऱ्यांच्या प्राप्त तक्रारींचे त्वरित निवारण करणे व त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी विशेष हेल्पलाइन किंवा व्हॉट्सअॅप क्रमांक उपलब्ध करून देणे. स्थानिक निगराणी समितीच्या दरमहा सभा आयोजित करून वरिष्ठ कार्यालयाशी समन्वय साधणे व अहवाल सादर करणे.
संबंधित तालुक्याचे निवासी नायब तहसीलदार, सदस्य सचिवः सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था सदस्यः तालुका कृषी अधिकारी, भारतीय कपास निगम लि. शाखा कार्यालय अकोला यांचेकडील नियुक्त केंद्र प्रमुख, आणि संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव