वाशिम येथे कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने PMFME योजनेअंतर्गत तीन दिवसीय अन्न प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.
नागरिकहिताला सर्वोच्च प्राधान्य देत सर्व विभागांनी परस्पर सहकार्याने काम करण्याचे आवाहन नीती आयोगाचे जिल्हा प्रभारी अधिकारी मुथ्थुकृष्णन शंकरनारायणन यांनी केले.
जिल्ह्यात हलक्या थंडीची चाहूल लागताच युरोप, सायबेरिया आदी देशांतून स्थलांतरीत पक्ष्यांचे आगमन सुरू झाले असून विविध तलावांवर त्यांच्या हजेरीत हळूहळू वाढ दिसत आहे.
वाशीमच्या सवासनी गावात घरगुती वादानंतर पत्नीने विहिरीत उडी मारली. तिला वाचवण्यासाठी पतीनेही उडी घेतली. दोघांनाही पोहता येत नसल्याने दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. गावात शोककळा पसरली.
Washim Municipality Election: प्रचारासाठीचा कालावधी मर्यादित असताना, सर्वच राजकीय पक्षांकडून 'विकासाच्या मुद्द्याला' हात घालून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
जळगाव शहर व परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपले. दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्यानंतर सायंकाळी पावणे आठच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार वारा आणि पावसाच्या सरी कोसळल्या.
आकाशात अधूनमधून ढगांची गर्दीही असल्याने सावलीनेही किंचित दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तळपत्या उन्हापुढे हा दिलासा फोल ठरत होता. दुपारी सर्वोच्च तापमान अनुभवण्यास मिळत आहे.
वाशिम जिल्ह्यातील बाभूळगाव गावात धक्कादायक घटना घडली आहे. 60 लाख रुपयांच्या खंडणीसाठी 14 वर्षीय मुलाचं अपहरण करण्यात आलं आहे. अपहरणाच्या घटनेला तब्बल 5 दिवस उलटूनही पोलिसांना कोणताही सुगावा लावलेला नाही.