Water bill to be charged through common water scheme meter in Pune PMC
पुणे : पुणे शहराच्या पालिकेकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेकडून आता मीटरद्वारे पाणीपट्टीचे बिल आकारले जाणार आहे. या पाणीपट्टीची बिलाने सुरुवात केली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाने तयार केला असून महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे. शहरात महापालिकेला पाण्याचा पुरवठा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे आता पाणी वापरा नियंत्रण आणण्यासाठी तसेच आवश्यक तेवढेच पाणी वापरावे यासाठी मोटरद्वारे पाणीपट्टीचे बील आकारले जाणार आहे.
शहरातील ज्या पाणीपुरवठा झोनमध्ये 90 टक्के मीटर बसविले आहेत, त्या भागात हो बिले दिली जाणार आहेत. तसेच ज्यांना मीटरने पाणीपुरवठा केला जाणार आहे, त्यांची मिळकतकरात आकारण्यात येणारी पाणीपट्टी रद्द केली जाणार आहे. ही पाणीपट्टी टेलिस्कोपिक दराने आकारली जाणार आहे. त्यामुळे जास्त वापर, अधिक बिल या तत्त्वावर आकारणी होईल, परिणामी, शहरातील पाण्याचा अनावश्यक वापर कमी होण्यास मदत होईल.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुणे महापालिकेकडून शहरातील नागरिकांना पुरेसे पाणी देण्यासाठी समान पाणी योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत शहरातील स्वतंत्र घरे, तसेच निवासी सोसायट्यांना पाणीमीटर बसविण्यात येणार आहेत. त्याअंतर्गत सुमारे 02 लाख 82 हजार पाणीमीटर बसविण्यात येणार असून, त्यापैकी 60 टक्क्यांहून अधिक मीटर बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. पाणी वितरणासाठी महापालिकेने शहरात 141 झोन तयार केले असून, त्यातील 47 झोनचे काम पूर्ण झाले आहे. काही झोनमध्ये 90 टक्के पाणीमीटर बसविण्यात आले आहे. या मीटरद्वारे पाण्याची मोजणी केली असता, अनेक ठिकाणी प्रतिव्यक्ती 500 ते 800 लीटर प्रतिदिन वापर असल्याचे समोर आले आहे. प्रत्यक्षात या योजनेअंतर्गत प्रतिव्यक्ती 135 लीटर पाणी वापरणे बंधनकारक आहे. त्यामुळे निकषापेक्षा जास्त पाणी वापर होत असल्याने तो कमी करण्यासाठी मीटरद्वारे पाणीपट्टी आकारली जाणार आहे. यामुळे पाणी वाया घालवण्यावर वचक बसवण्यात पालिकेला यश मिळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पाणी मीटरद्वारे पाणीपट्टी आकारताना महापालिका १ हजार लिटर पाण्यासाठी साईसात रुपये शुल्क अकारणार आहे. मामजेच एखाद्या घरात सहा ते सात व्यक्ती असल्यास त्यांना दररोज निकयखानुसार पाणी घेतल्यास अवी साडेसात रुपयाचे पाणी बिल महापालिकेस द्यावे लागणार आहे, तसेथ निक्रयापेक्षा जास्त पाणी घेतल्यास जादा पैसे मोजावे लागणार आहेत. परिणामी, पाण्याचे किल अधिक आत्यास नागरिक पाण्याचा वापर कमी करतील, असे महापालिकेचे म्हणणे आहे. मीटरद्वारे पाणीही आकारण्यात वेगान्य झोनमधील नागरिकांच्या मिळकतकरातील पाणीपट्टी मीटरने बित आधाररणी सुरू झाल्यानंतर तात्काळ रद्द केली जाणार आहे. मात्र शहरामध्ये उन्हाळा लागल्यापूर्वीच पाणीटंचाई भासत आहे. अनेक ठिकाणी कमी दाबाने आणि कमी पाणी येत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यावरुन तक्रार देखील केली जात आहे.