मुंबई- आज दिवसभरात अनेक महत्वाचे कार्यक्रम तसेच घडामोडी घडण्याची शक्यता आहे. कोर्टात (Court) मुंबई तसेच दिल्लीत (delhi) सुनावणी पार पडणार आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये ओबीसी समाजाकडून आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मोर्चा काढण्यात येणार आहे. तर भाजपच्या केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक दिल्लीत होणार आहे. आणि राज्यातील काही भागात पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. जाणून घेऊया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी…
दिवसभरातील महत्त्वाचे काय…
राज्यातील काही भागात पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
नवी दिल्ली – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत जागावाटपाच्या सूत्रावर चर्चा होणार असल्याची शक्यता आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार आहेत.
पुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 36 संघटनांच्या समन्वय समितीच्या बैठकीला सुरुवात होणार आहे. या बैठकीला सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
पत्रकार परिषद
भाजपा नेते आमदार नितेश राणे, सकाळी 11.30 वाजता, स्थान: 905/9, आर्केडिया बिल्डिंग अर्नेस्ट हाउस जवळ, एनसीपीए रोड, नरीमन पॉइंट,
मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार वेळ: दुपारी 2.00 वाजता, स्थानः भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालय , योगक्षेमसमोर वसंतराव भागवत चौक,नरिमन पॉईंट
ओबीसी समन्वय समिती आजपासून अन्नत्याग आंदोलन
राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असतानाच दुसरीकडे आता ओबीसी मोर्चा काढण्यात येणार आहे. ओबीसमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध होत असून, ओबीसी समन्वय समिती आजपासून अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये हे आंदोलन करण्यात येणार आहे.
बुलढाण्यात मराठा समाजाचा मोर्चा, जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज सकल मराठा समाजाकडून मोर्चा काढण्यात येणार आहे.
अहमदनगरमध्ये रास्ता रोको – जालना येथील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आणि मराठा समाजाला 50 टक्के आरक्षण देण्यासाठी अहमदनगरमध्ये रास्ता रोको करण्यात येणार आहे.
नागपूरचे वकील सतीश उके यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे.