मुंबई- आज दिवसभरात अनेक महत्वाचे कार्यक्रम तसेच घडामोडी घडण्याची शक्यता आहे. आज क्रिकेट वर्ल्डकपमध्ये बांग्लादेश आणि अफगानिस्तान यांच्यात सामना होणार आहे. आज कोर्टात (Court) मुंबई तसेच दिल्लीत (delhi) सुनावणी पार पडणार आहे. तसेच मान्सून परतीच्या मार्गावर असून…, राज्यातील काही भागात पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. जाणून घेऊया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी…
दिवसभरातील महत्त्वाचे काय…
राज्यात मान्सून परतीच्या मार्गावर असून…, राज्यातील काही भागात पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
आज कोर्टात (Court) मुंबई तसेच दिल्लीत (delhi) सुनावणी पार पडणार आहे
राष्ट्रवादी काँग्रेस प्रकरणी निवडणूक आयोग 9 ऑक्टोबरला पुन्हा सुनावणी करणार, शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, त्यांनी निवडणूक आयोगाकडे या प्रकरणी त्यांची बाजू पूर्णपणे ऐकून घेण्याची मागणी केली आहे.
गोरेगांवमध्ये काल लागलेल्या आगीवर राजकीय व सामाजिक क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया येताहेत.
रविवार दि. ८.१०.२०२३ रोजी मध्य रेल्वेवर कोणताही मेगा ब्लॉक नाही, त्यामुळं प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
आज क्रिकेट वर्ल्डकपमध्ये बांग्लादेश आणि अफगानिस्तान यांच्यात सामना होणार आहे.
तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात आज दुसरा सामना होणार आहे
भारताने काल जपानला हरवत, आशिया स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. त्यामुळं अनेक वर्षानंतर भारताला आशिया स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले आहे
उद्या क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारताचा सलामीचा सामना कांगारुसोबत होणार आहे. स्पर्धेत उद्या भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया बरोबर आहे. त्यामुळं या सामन्यात भारत कशी कामगिरी करतो, याकडे संपूर्ण क्रिक्रेटप्रेमीचे लक्ष लागले आहे.