मोहोळ: राज्यातील विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. येत्या काही दिवसातच निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. युती आणि आघाडीतील वाद दिवसेंदिवस रंगत चालला आहेत. अशातच सोलापूरमध्ये मात्र वेगळ्याच वादाची ठिणगी पडली आहे. या वादामुळे जिल्ह्यातील मोहोळमध्ये राजकारण तापलं आहे. याचं कारण म्हणजे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सोलापूर दौरा. अजित पवार यांच्या गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी मोहोळ बंदची हाक देत अजित पवार यांचा दौराही रद्द झाल्याचे सांगितले.यावरून अजित पवार यांनी उमेश पाटलांना खडे बोल सुनावले.
राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांच्याशी असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर उमेश पाटील यांनी थेट अजित पवार यांनाच आव्हान देण्याचा प्रयत्न केला. “दादा आपसे बैर नही राजन पाटील तेरी खैर नही,” असे म्हणत उमेश पाटील चांगलेच आक्रमक झाले होते. पण अजित पवार यांनी मोहोळमध्ये उमेश पाटलांचा चांगलाच समाचार घेतला. अजित पवार म्हणाले, “कुत्रं गाडी खाली जाते, तसं त्याला वाटते तोच गाडी चालवतो. कोणीतरी म्हणाला, मीच दादाचा दौरा रद्द केला. पण अजित पवारांचा दौरा रद्द करणारा अजून जन्माला यायचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अचनाक महाराष्ट्राच्या दौऱ्यावराले म्हणून मी मोहोळचा दौरा रद्द केला होते. असे म्हणत अजित पवार यांनी उमेश पाटील यांचे नाव न घेता टीका केली.
हेही वाचा: National Daughter’s Day : ऑन-स्क्रीन मुलगी आणि आई-वडिलांची मने जिंकणारी सुंदर जोडी
आगामी काळात मोहोळकरांनानिधी कमी पडू देणार नाही, मोहोळ आणि बारामती फार दूर नाही. मी शब्दाचा पक्का आहे. मिळालेल्या संधीचा आणि पदाचा वापर आपल्या भागातील लोकांचा विकास करण्यासाठी करता येईल, यासाठी करावा. पण काहीजण सतत टीकाच करत असतात मी त्याकडे लक्ष देत नाही. पण आपण आपल्या लोकांना फसवायचं नाही. लुबाडायचं नाही, असेही अजित पवार यांनी नमुद केले.