
मुंबई : ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात करणारी स्टार कीड बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे ही आज तिचा २४ वा वाढदिवस साजरा करीत आहे. अनन्या पांडे ही बॉलिवूड मधील एक सुप्रसिद्ध अशी युवा अभिनेत्री असून कमी कालावधीतच तिने बॉलिवूड मध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.
अनन्या तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. अनन्या पांडेचे वडील चंकी पांडे हे स्वतः अभिएंटे असून अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. अनन्याने तिच्या करिअरची सुरुवात स्टुडंट ऑफ द इयर 2 या चित्रपटातून केली. त्यानंतर ती ‘पती पत्नी और वो’, ईशान खट्टरसोबत ‘खाली पीली’मध्ये दिसली होती. २०२२ मध्ये अनन्याने गेहराईया आणि लायगर यांसारखे चित्रपट दिले. लायगर या चित्रपटातून अनन्या साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत दिसली होती. या चित्रपटातून अनन्याने साऊथमध्येदेखील पदार्पण केले.
अनन्या पांडे ही अभिनेत्री असल्याने मुख्यत्वे तिची कमाई ही चित्रपट आणि जाहिरातींतून असते. अनन्या तिच्या प्रत्येक चित्रपटासाठी सुमारे दोन कोटी इतके मानधन घेते. तर यासोबतच ती ब्रॅंडच्या जाहिरातीसाठी लाखो रुपये घेते. माहिती नुसार अनन्या पांडेची एकूण संपत्ती ३० कोटींहून अधिक आहे. अनन्या पांडेचे स्वतःचे आलिशान घर आहे. मुंबईतील पाली हिल येथील एका घरात ती आपल्या कुटुंबियांसह राहते. तिच्या या घराची किंमत करोडोंमध्ये असल्याचे सांगितले जाते.
अनन्या पांडेला लक्झरी कारची देखील खूप आवड आहे. तिच्या कार कलेक्शनमध्ये ८८. २४ लाख किमतीची ‘रेंज रोव्हर स्पोर्ट’, ६३. ३० लाखांची ‘मर्सिडीज-बेंझ ई-क्लास’, ३३ लाख किंमतीची ‘स्कोडा कोडियाक’ आणि इतर अनेक कारचा समावेश आहे.