Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्याची मधुरा जसराज यांच्यासाठी खास पोस्ट, शेअर केल्या खास आठवणी

प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित जसराज यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या कन्या मधुरा जसराज यांचे बुधवारी सकाळी (२५ सप्टेंबर) त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. जसराज यांच्यासोबतच्या आठवणी जाग्या करत 'आई कुठे काय करते' फेम अनिरुद्ध अर्थात अभिनेता मिलिंद गवळीने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Sep 26, 2024 | 03:47 PM
'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्याची मधुरा जसराज यांच्यासाठी खास पोस्ट, शेअर केल्या खास आठवणी

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्याची मधुरा जसराज यांच्यासाठी खास पोस्ट, शेअर केल्या खास आठवणी

Follow Us
Close
Follow Us:

प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित जसराज यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या कन्या मधुरा जसराज यांचे बुधवारी सकाळी (२५ सप्टेंबर) त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. मधुरा 86 वर्षांच्या होत्या आणि अनेक दिवसांपासून आजारी देखील असल्याचे वृत्त समोर आले आहे. मधुरा जसराज यांच्यासोबतच्या आठवणी जाग्या करत ‘आई कुठे काय करते’ फेम अनिरुद्ध अर्थात अभिनेता मिलिंद गवळीने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्याने त्यांच्यासोबतचे काही फोटोही शेअर केले आहेत.

हे देखील वाचा – पंडित जसराजच्या पत्नी मधुरा जसराजनी घेतला अखेरचा श्वास, वयाच्या ८६ व्या वर्षी झाले निधन!

शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेता मिलिंद गवळीने लिहिलंय की, “मधुरा पंडित जसराज आई काल आपल्या सगळ्यांना सोडून निघून गेल्या. दुर्गा ताईंनी मला जेव्हा ही बातमी कळवली आणि मी सुन्न झालो. २००९ ला माझी आई मला सोडून गेली आणि मी मनाने खूप खचून गेलो होतो. अचानक २०१० च्या सुरुवातीला एका चित्रपटाच्या निमित्ताने मधुराजी जसराज “यांना आपल्याला भेटायचं आहे, असा एक मला फोन आला”, त्या लतादीदींना भेटून परत घरी जाताना सिद्धिविनायक मंदिराच्या समोरच्या बरीस्ता मध्ये आमची भेट झाली.”

 

“मधुराआई म्हणाल्या, “मी एक मराठी चित्रपट दिग्दर्शित करते आहे. त्या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेसाठी मी एका कलाकाराच्या शोधात आहे.” त्यांनी मला चित्रपटाचं नाव सांगितलं “आई तुझा आशिर्वाद” या चित्रपटाचं नाव ऐकूनच मला खात्री पटली की, माझ्या आईने माझ्यासाठी हा आशीर्वादच पाठवला आहे. मी मनामध्ये ठरवून टाकलं की हा चित्रपट आपण करायचा. मधुरा आईंना पण मी त्या भूमिकेसाठी योग्य वाटलो, आणि त्या क्षणापासून आमच्यात एक वेगळं नातं निर्माण झालं, मधुराआई इतक्या मोठ्या होत्या की त्याची कोणीही कल्पना करू शकत नाही. आणि त्या क्षणापासून आमच्यात एक वेगळं नातं निर्माण झालं, मधुराआई इतक्या मोठ्या होत्या की त्याची कोणीही कल्पना करू शकत नाही, त्या व्ही. शांताराम बापू यांच्या त्या कन्या आणि पंडित मार्तंड जसराज यांच्या त्या अर्धांगिनी, आणि त्यांची स्वतःची पण एक वेगळी प्रतिमा. इतक्या मोठ्या व्यक्तीबरोबर मला काम करायला मिळतंय हे माझं भाग्य होतं. आणि माझ्या आईच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य नव्हतं.”

हे देखील वाचा – ‘रुह बाबा’ देणार ‘मंजुलिका’ला टक्कर! कार्तिकने ‘भूल भुलैया 3’चे शेअर केले भयानक पोस्टर!

“वयाच्या ७६-७७ वर्षी सुद्धा त्यांच्यामध्ये एका तरुण व्यक्तीची ऊर्जा होती, या सिनेमाचं शूटिंग ची सुरुवात कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात झाली, मुहूर्त कोल्हापूरचे शाहू महाराज आणि पंडित जसराज यांच्या हस्ते झाला, मदुराईंनी हा चित्रपट अगदी सुंदर पद्धतीने दिग्दर्शित केला, या चित्रपटामध्ये पंडित जसराज जी आणि लतादीदी यांचं एक अतिशय सुंदर गाणं आहे ते गाणं मधुराआई नी माझ्यावर चित्रित केलं. चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळेला पण मी त्यांच्याबरोबर असायचो, आमच्यात आई मुलाचं नातं निर्माण झालं, माझी आई मला सोडून गेली आहे याची त्याची मधुरा आईंना सतत जाणीव असायची, त्या इतक्या मोठ्या होत्या तरी मला त्या आईची माया द्यायच्या. आज पुन्हा एकदा आई सोडून गेली. मधुरा आई आणि पंडित जसराज यांनी मला त्यांच्या कुटुंबाचा भाग करून घेतलं होतं, आज हे दोघेही महान व्यक्ती आपल्यामध्ये नाही आहेत, पण त्यांचं प्रेम, त्यांनी दिलेली माया आणि त्यांची कीर्ती, सुदैवाने त्यांच्याबरोबर चे क्षण आणि असंख्य मनाला समाधान देणाऱ्या सुंदर आठवणी, कायम माझ्याजवळ राहतील, त्यांच्या आत्म्यास शांती मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना.”

Web Title: Aai kuthey kay karte actor milind gawali shared memories of actress and director madhu jasraj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2024 | 03:47 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.