aamir khan
आमिर खान (Aamir Khan) त्याच्या कथांद्वारे अनोखे विषय प्रेक्षकांसमोर आणत असतो. अशातच त्याचा आगामी चित्रपट ‘चॅम्पियन्स’बद्दल (Champions) बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरु आहे . या चित्रपटाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी सिनेप्रेमी आतुरतेने वाट पाहत असतानाच, आता या चित्रपटाविषयी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. अलीकडेच, आमिर खान (Aamir Khan Statement About Champions) त्यांच्या बालपणीच्या मित्राच्या कार्यक्रमात उपस्थित होते, जिथे त्यांनी ‘चॅम्पियन्स’ या चित्रपटाबद्दल खुलासा केला.
[read_also content=”मीनल दळवींच्या अडचणी वाढणार ? आमदार महेंद्र दळवींनी केली जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी https://www.navarashtra.com/maharashtra/mla-mahendra-dalvi-letter-to-collector-for-inquiry-of-meenal-dalvis-work-nrsr-344901.html”]
आमिर खानने अलीकडेच त्याच्या बालपणीच्या मित्राच्या कार्यक्रमासाठी दिल्लीला हजेरी लावली, जिथे त्याने ‘चॅम्पियन्स’ बद्दल एक खुलासा केला. आमिर खान चित्रपटाचा निर्माता बनण्याबाबत म्हणाला की, “ही एक उत्कृष्ट स्क्रिप्ट आहे आणि एक सुंदर कथा आहे. हा एक अतिशय हृदयस्पर्शी आणि सुंदर चित्रपट आहे. पण, मला असे वाटते की मला ब्रेक घ्यायचा आहे. मला माझ्या कुटुंबासोबत राहायचे आहे, मला माझ्या आई आणि माझ्या मुलांसोबत राहायचे आहे.” तो पुढे म्हणाला, “मी ‘चॅम्पियन्स’ची निर्मिती करणार आहे कारण माझा चित्रपटावर विश्वास आहे, मला वाटते की ही एक उत्कृष्ट कथा आहे.”
आमिर खान प्रॉडक्शन्स, सोनी पिक्चर्स इंटरनॅशनल प्रॉडक्शन्स, इंडिया आणि २०० नॉटआउट प्रॉडक्शन्स या चित्रपटाची सहनिर्मिती करणार आहेत.