Aamir Khan allegedly dating a woman from bangalore actor introduces her to family who is she
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट या नावाने अवघ्या इंडस्ट्रीमध्ये फेमस असलेला अभिनेता आमिर खान पुन्हा प्रेमात पडल्याचं वृत्त समोर येत आहे. अभिनेता आता पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा नाही तर तिसऱ्यांदा प्रेमात पडला आहे. ५९ वर्षीय अभिनेता एका महिलेच्या प्रेमात पडल्याचे वृत्त आहे. होय ही बातमी खरी आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आमिर खान बंगळुरुमधल्या एका महिलेच्या प्रेमात पडल्याचे वृत्त आहे. नुकतंच आमिरने आपल्या घरच्यांना तिची भेट घालून दिल्याची माहितीही समोर येत आहे. पण नेमकी ती कोण आहे ? ती काय करते याची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही.
रॅपर रफ्तारने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, ५ वर्षांपूर्वी झालेला घटस्फोट; लग्नाचे फोटो आले समोर
९०च्या दशकामध्ये, प्रेक्षकांचे खळखळून मनोरंजन करणारा आमिर खान सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे जबरदस्त चर्चेत आहे. ‘फिल्मफेअर’ ने दिलेल्या वृत्तानुसार, आमिर खानच्या आयुष्यात गेल्या काही दिवसांपासून एक मिस्ट्री वुमन आली आहे. जी मुळची बंगळुरुची आहे. अभिनेत्याच्या जवळच्या माणसांकडून ही माहिती देण्यात आलेली आहे. सध्या, आमिर आपल्या गर्लफ्रेंडबद्दल काहीही सांगू इच्छित नाही. सर्वांनीच त्याच्या प्रायव्हसीचा आदर करावा. तो या रिलेशनशिपध्ये खूप सीरियस आहे. त्याने या मिस्ट्री वुमनची भेट कुटुंबातील सदस्यांशीही करुन दिली आहे. कुटुंबाशी भेटही चांगली झाल्याची माहिती आहे.
आमिर खान कायमच त्याचं खासगी आयुष्य लाईमलाईटपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र, या नव्या बातमीमुळे त्याच्या खासगी आयुष्याबद्दल चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. अद्याप, कोणीही आमिर खानच्या ह्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. अभिनेता तिसऱ्यांदा प्रेमात पडल्याची बातमी खरी असल्याचं सांगितलं जात असल्याने आमिरच्या आयुष्यातील ही नवी सुरुवात असेल. गेल्या काही दिवसांपूर्वीही तो तिसऱ्यांदा प्रेमात पडला आहे, असे वृत्त वाऱ्यासारखे पसरले होते. यावेळी त्याने मी ५९ व्या वर्षात पुन्हा एकदा लग्न करणार नाही, ही गोष्ट मला तरी सध्या अवघड दिसतेय. असं तो मुलाखतीत म्हणाला होता.
१९८६ साली आमिर खानने रिना दत्तासोबत पहिल्यांदा लग्न केलं होतं. जी त्याची बालमैत्रीण होती, पण तरीही त्यांनी घटस्फोट घेतला होता. आमिर आणि रिनाने १६ वर्षांनी २००२ साली घटस्फोट घेतला होता. त्यानंतर आमिरने २००५ साली दिग्दर्शिका किरण रावसोबत लग्नगाठ बांधली होते. त्यांची एकमेकांसोबत ओळख ‘लगान’ च्या सेटवर झाली होती. पण, आमिर आणि किरणचाही १६ वर्षांनंतर २०२१ साली घटस्फोट झाला. आमिर खानला पहिल्या पत्नीपासून आयरा आणि जुनैद ही दोन मुलं आहेत. तर आमिरला दुसऱ्या पत्नीपासून आझाद हा मुलगा आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी, आमिरचं नाव ‘दंगल’ फेम अभिनेत्री फातिमा सना शेखसोबत जोडलं गेलं होतं. मात्र ती केवळ एक अफवाच निघाली. मात्र, आता आमिरच्या ह्या तिसऱ्या प्रेमाबद्दलच्या चर्चा कितपत खऱ्या ठरत आहे. हे येत्या काही दिवसांत कळेल.