मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या (Aamir Khan) आईबद्दल धक्कायदायक एक बातमी समोर आली आहे. आमिर खानची आई जीनत हुसेन (Zeenat Hussain) यांना काल रात्रीच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त आहे. त्यानंतर त्यांना तातडीने मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या
मिळालेल्या माहितीनुसार, आमिर खान कुटुंबियांसोबत पाचगणीत कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी गेला होता.या दरम्यान त्याची आई जीनत हुसेन यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर आमिरने लगेचच त्यांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल केले सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. आमिरदेखील सध्या ब्रीच कॅन्डी रुग्णालयात आईसोबत आहे.
[read_also content=”बिहारच्या औरंगाबादमध्ये छठपुजे दरम्यान गर्दीत चिरडून महिलेचा मृत्यू, मुलगी गंभीर जखमी https://www.navarashtra.com/india/a-woman-was-crushed-to-death-during-chhath-puja-in-aurangabad-bihar-nrps-340463.html”]
आमिरचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधीपासून चर्चेत होता. मात्र, प्रेक्षकांनी चित्रपटाकडे पाठ फिरवली. या सिनेमात आमिरसोबत करीना कपूर मुख्य भूमिकेत होती.