फ्लॅट रंगविण्यासाठी आला अन् चुना लावून गेला, अभिनेत्री पूनम ढिल्लनच्या घरी लाखोंची चोरी
८० आणि ९०च्या दशाकातील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये पूनम ढिल्लनची गणना केली जाते. अभिनेत्री पूनम ढिल्लन सध्या एका वेगळ्या बातमीमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री पूनम ढिल्लनच्या मुंबईतल्या खारमधील घरामध्ये चोरी झाली आहे. अभिनेत्रीच्या घरातील लाखो रुपयांचं सामान चोरट्यांनी लंपास केलं आहे. चोरी करणाऱ्या चोरट्याला खार पोलिसांनी अटक केली आहे. अभिनेत्रीच्या घरी चोरी २८ डिसेंबर ते ५ जानेवारी दरम्यान झाली होती. घराचं रंग काम करण्यासाठी आलेल्या कारागिराने अभिनेत्रीच्या घरावर डल्ला मारला आहे.
‘जिलबी’ ट्रेलर लाँचदरम्यान प्रसाद ओकने शेअर केल्या स्वप्नील जोशीच्या काही खास गोष्टी!
अभिनेत्रीच्या घरावर डल्ला मारणाऱ्या चोरट्याचं नाव समीर अन्सारी असून तो ३७ वर्षीय आहे. चोरट्याने पूनम ढिल्लनच्या घरातून तब्बल एक लाख रुपये किंमतीचा हिऱ्याचा हार, काही अमेरिकन डॉलर्स आणि ३५ हजार रुपयांची रोख चोरल्याप्रकरणी खार पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. अभिनेत्रीच्या घरी चोरी झाल्याचा खुलासा झाल्यानंतर पोलिसांनी चोरट्याची कसून चौकशी केली. कसून चौकशी केल्यानंतर त्याला ६ जानेवारीला खार पोलिसांनी अटक केली आहे.
“बाहेर पडणं गरजेचं असतं…” तेजश्री प्रधान असं का म्हणाली ?
अभिनेत्री मुख्यतः जुहू येथे राहते, तर तिचा मुलगा अनमोल खारच्या घरी राहतो. तर केव्हातरी अभिनेत्री खारच्या घरी राहायची. पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पूनमच्या घरात पेंटिंगचे काम सुरू होते. २८ डिसेंबर ते ५ जानेवारी या कालावधीत समीर अन्सारी अभिनेत्रीच्या खारमधल्या फ्लॅटमध्ये रंगकाम करत होती. दरम्यान, आरोपींनी संधीचा फायदा घेत कपाट उघडे पाहून तेथून मौल्यवान वस्तू चोरल्या. शिवाय, चोरलेल्या पैशातून चोरट्यांनी काही पैशांची पार्टीही केली. पूनमचा मुलगा जेव्हा अनमोल दुबईहून भारतात परतला तेव्हा त्याला घरातल्या अनेक गोष्टी हरवल्या असल्याच्या दिसल्या. अनमोलने तत्काळ पोलिसांत तक्रार केली आणि त्यानंतर घरामध्ये चोरी झाल्याचे उघडकीस आले.