ममता कुलकर्णीने दिला 'महामंडलेश्वर' पदाचा राजीनामा; म्हणाली, "साध्वी होती, साध्वीच राहिन..."
९० च्या दशकातील बॉलिवूड इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री ममता कुलकर्णी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. २५ वर्षांच्या मोठ्या काळानंतर डिसेंबर २०२४ मध्ये केनियाहून भारतात ममता परतली होती. भारतात आल्यानंतर अभिनेत्रीने प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यामध्ये हजेरी लावली होती. तिला महाकुंभमेळ्यामधून किन्नर आखाड्याने महामंडलेश्वर ही पदवीही दिली. मात्र यानंतर मोठा वाद झाला. ममताला ही पदवी दिल्याने अनेक साधु महंत नाराज झाले होते. अखेर अनेक मतंमतांतरानंतर ममताने महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिला आहे. तिने व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली आहे.
भर कॉन्सर्टमध्येच सोनू निगम चाहत्यांवर भडकला; म्हणाला, ‘उभंच राहायचं असेल तर निवडणुकीत…’ Video Viral
गेल्या काही दिवसांपूर्वीच ममताने महाकुंभामध्ये स्वत:चे पिंडदान केले होते. त्यानंतर तिला किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर करण्यात आले होते. अभिनेत्रीने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत महामंडलेश्वर पदाचा राजीनामा देत असल्याची तिने माहिती दिली आहे. ती म्हणते की, “मी किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर ‘यमाई ममता नंदगिरी’ या पदाचा राजीनामा देत आहे. आज किन्नर आखाड्यात आणि इतरांमध्ये मला महामंडलेश्वर उपाधी देण्यावरुन जो वाद होत आहे. मी एक साध्वी होते आणि साध्वीच राहीन. महामंडलेश्वर हा सम्मान मला मिळाला होता तो त्यांना मिळतो ज्याने तपस्या केली असते. मी तपस्या केली, बॉलिवूड, ग्लॅमर सगळं सोडलं. पण तरी काहींना माझ्या या पदावरुन आपत्ती आहे. म्हणून मी हे पद सोडत आहे. महामंडलेश्वर होणं म्हणजे इतरांना आपल्याकडील ज्ञान देणं ते मी करतच राहीन.”
ममताला किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर बनवण्यावरून बराच वाद झाला होता. हा वाद हाताबाहेर जात असल्याचे पाहून ममतांनी हा निर्णय घेतला आहे. मी गेल्या २५ वर्षांपासून साध्वी आहे आणि भविष्यातही साध्वीच म्हणून राहीन, असं तिने स्पष्ट केलं आहे. प्रयागराज महाकुंभात, ममताने किन्नर आखाड्याची दीक्षा घेतली होती, त्यानंतर तिला लगेचच महामंडलेश्वर बनवण्यात आले. तिने पिंडदान केले, संगमात स्नान केले, नंतर तिला अभिषेक करून महामंडलेश्वर बनवण्यात आले. ममता कुलकर्णी महामंडलेश्वर होताच अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होऊ लागले.
ममता कुलकर्णी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही कमालीची चर्चेत राहिली आहे. अंडरवर्ल्ड छोटा राजनबरोबर तिचं नाव जोडलं गेलं होतं. ममता कुलकर्णी काही वर्षांपूर्वी २ हजार कोटी किंमतीच्या ड्रग्स केसमध्ये अडकली होती. तिच्याविरोधात अटकेचा वॉरंटही होता मात्र ती भारताबाहेर गेली. विकी गोस्वामी हा या केसमागचा सूत्रधार होता. अभिनेत्रीने २००२ साली ड्रग्ज माफिया विकी गोस्वामीबरोबर लग्नागाठ बांधली. लग्नानंतर बॉलिवूडपासून दूर राहिलेली ममता पतीबरोबर केनियाला स्थायिक झाली होती. त्यानंतर अभिनेत्री ममता कुलकर्णी बॉलिवूडमधून गायब झाली.
‘द वेकिंग ऑफ अ नेशन’ चा टीझर प्रदर्शित, सोनी लिव्ह घेऊन येत आहे जालियनवाला बाग हत्याकांडाची कहाणी!
अंमली पदार्थ तस्करीप्रकरणी ममता आणि तिच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यशाच्या शिखरावर असताना अचानक तिच्या करिअरला उतरती कळा लागली. त्यानंतर ती बॉलिवूडमधून गायब झाली. ममताने ‘तिरंगा’ शिवाय, ‘आशिक’, ‘आवारा’, ‘क्रांतिवीर’, ‘वक्त हमारा हैं’, ‘सबसे बडा खिलाडी’, ‘करण अर्जुन’ यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.. तिला इंडस्ट्रीमध्ये बॉलिवूडमधील रिजेक्शन क्वीन म्हटलं जायचं, कारण तिने अनेक चित्रपटांची ऑफर धुडकावून लावली होती.