Adipurush- ‘आदिपुरुष’ चित्रपटाबाबतचे वाद काही संपतासंपत नाहीए. या चित्रपटाला प्रेक्षक तर विरोध करत आहेत. मात्र, त्याला राजकीय वळण देखील मिळाताना दिसत आहे. हा वादा अगदी कोर्टात पोहचला. सर्व स्तरातून चित्रपटावर बंदी घालायची मागणी केली जात आहे. प्रसिद्ध अभिनेते मुकेश खन्ना यांनी आदिपुरुषाला रामायणाचा अपमान म्हणत यावर टीका करत, सैफ अली खानच्या भूमिकेवरही भाष्य केलं आहे. (mukesh khanna) (saif ali khan) (adipurush controversy)
याआधीही मुकेश खन्ना यांनी या चित्रपटावर टीका केली होती. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मुकेश खन्ना यांनी “आदिपुरुष हा सध्याच्या युगातील सर्वात विनोदी चित्रपट असल्याचं म्हटलं आहे. हा चित्रपट म्हणजे रामायणाचा घोर अपमान आहे. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला परवानगी कशी दिली? हा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. या चित्रपटाला प्रेक्षकवर्ग नक्कीच फ्लॉप ठरवतील.”
तर, मुकेश खन्ना यांनी आदिपुरूषमधील रावणाच्या भूमिकेवरही टीका केली आहे. “रावण इतका भयानक दिसू शकतो, पण तो चंद्रकांतामधील शिवदत्त-विश्वरूप सारखा कसा काय दिसू शकतो? चित्रपटातील रावणाचं कॅरेक्टर फारच विनोदी झालं आहे. जेव्हा चित्रपटाची घोषणा झाली होती तेव्हा सैफने रावण हे पात्र वेगळ्या पद्धतीने साकारणार असं वक्तव्य केलं होतं. तेव्हादेखील मी म्हणालो होती की, महाकाव्यातील पात्रांमध्ये बदल करणारे तुम्ही कोण?”
“ओम राऊतलाही रावणासाठी सैफ अली खानलाच का घ्यावंसं वाटलं, याहून उत्तम पर्याय इंडस्ट्रीमध्ये नाहीयेत का? या चित्रपटातील सैफ रावण नव्हे तर तस्करी करणारा गुंड वाटतोय.” आदिपुरुष हा चित्रपट एक तमाशा आहे असंही मुकेश खन्ना म्हणाले.
दरम्यान, या आधी या भूमिकेसाठी ओम राऊतने अभिनेता अजय देवगणला विचारलं होतं. मात्र, त्याने या भूमिकेसाठी नकार दिला. अजय देवगणने बिझी शेड्युलमुळे रावणाची भूमिका नाकारली होती.
‘आदिपुरुष’मधील रावणाच्या भूमिकेसाठी अजय देवगण योग्य ठरला असता, असे अनेकांचं मत आहे. पण, अजयने घेतलेला हा निर्णय योग्य असल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. ‘आदिपुरुष’ हा सिनेमा प्रदर्शनापासूनच VFX , संवाद, कलाकारांची निवड यामुळे वादात सापडलेला असताना आता चित्रपटाच्या निगेटीव्ह पब्लिसिटीमुळे या चित्रपटाच्या कलेक्शनवर परिणाम झाला आहे.