
Adipurush Box Office Collection Day 7 : (Adipurush) हा सिनेमा रिलीजआधीपासूनच चर्चेत होता. प्रभास (Prabhas),क्रिती सॅनॉन (Kriti Sanon),सैफ अली खान (Saif Ali khan) या तगड्या स्टारकास्टमुळे या सिनेमाची चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता होती. पण रिलीजनंतर या सिनेमावर प्रेक्षक नाराजी व्यक्त करत आहेत. ‘आदिपुरुष’ने रिलीजच्या पहिल्या दिवशी चांगलीच कमाई केली. पण नंतर या सिनेमाच्या कमाईत घट झाली आहे.
‘आदिपुरुष’ सिनेमाच्या निर्मात्यांनी हा सिनेमा चालावा यासाठी 22 आणि 23 जूनला खास ऑफर ठेवली होती. ही ऑफर म्हणजे, ‘आदिपुरुष’ सिनेमाच्या तिकीटांची किंमत 150 रुपये ठेवण्यात आली होती. पण या ऑफरचा सिनेमाच्या कमाईवर कोणताही परिणाम झाला नाही.
‘आदिपुरुष’ या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 86 कोटींची कमाई केली होती. पण नंतर या सिनेमाच्या कमाईत घट व्हायला लागली. आतापर्यंत या सिनेमाने 260.55 कोटींचा गल्ला जमवला आहे.
‘आदिपुरुष’ या सिनेमाने जगभरात 400 कोटींचा टप्पा पार केला आहे. या सिनेमाने रिलीजच्या सहा दिवसांत जगभरात 410 कोटींची कमाई केली होती. 500 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कोटींची कमाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.