लाईव्ह कान्सर्टदरम्यान आदित्य नारायण संतपला! फॅनचा फोन गर्दीत फेकला, सोशल मीडियावर होतोय ट्रोल
आदित्य नारायण अनेकदा त्याच्या रागामुळे चर्चेत असतो. नुकताच तो एका कॉलेजच्या संगीत महोत्सवात परफॉर्म करण्यासाठी गेला होता. जिथे त्याला ऐकण्यासाठी हजारोंचा जमाव जमला होता.
बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण (Udit Narayan) यांचा मुलगा आदित्य नारायण (Aditya Narayan)अनेकदा चर्चेत असतो. बॉलिवूडमध्ये गायक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्यात आदित्य यशस्वी ठरला आहे. नुकताचं छत्तीसगडला त्याचा एक कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता . जिथे त्याच्या शो दरम्यान असे काही घडले ज्यामुळे त्याला आता सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घ्या.
[read_also content=”रकुल-जॅकीच्या घरी लगीनघाई, गोव्यात होणार डेस्टिनेशन वेडिंग; लग्नाची पत्रिका व्हायरल! https://www.navarashtra.com/movies/rakul-jackky-marriage-card-goes-viral-as-couple-will-knot-a-tie-in-goa-nrps-506441.html”]
लाईव्ह शोमध्ये चाहत्यावर नाराज
आदित्य नारायण अनेकदा त्याच्या रागामुळे चर्चेत असतो. नुकताच तो एका कॉलेजच्या संगीत महोत्सवात परफॉर्म करण्यासाठी गेला होता. जिथे त्याला ऐकण्यासाठी हजारोंचा जमाव जमला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आदित्य नारायण ‘डॉन’ चित्रपटातील एक गाणे गात असताना त्याला एका गोष्टीचा राग आला. लाईव्ह शो दरम्यान त्याने त्याच्या एका चाहत्याचा फोन हिसकावून फेकून दिला. आदित्यचे हे चुकीचे वागणे पाहून तिथे उपस्थित असलेले सगळेच थक्क झाले.
सोशल मीडियावर होतोय ट्रोल
आदित्य नारायणचा हा व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. आदित्यचा हे वागणं लोकांना आवडलं नाही आहे. त्यामुळे लोक त्याला सोशल मीडियावर खूप ट्रोल करत आहेत. एका युजरने लिहिले आहे, ‘श्रीमंत बापाचा बिघडलेला मुलगा’, तर दुसऱ्याने लिहिले आहे की, ‘आदित्य नारायणच्या शोवर बहिष्कार टाकावा, तो वडिलांचे नाव खराब करत आहे.’ आदित्यला कशामुळे राग आला आणि त्याने हे पाऊल का उचलले हे लोकांना समजू शकलेले नाही.
यापुर्वीही झालाय ट्रोल
आदित्य नारायणचे नाव अनेकदा कोणत्या ना कोणत्या वादाशी जोडले जाते. नुकतेच ‘इंडियन आयडॉल’ या शोदरम्यान त्याचे महान गायक किशोर कुमार यांच्या मुलासोबत भांडण झाले होते. त्या घटनेनंतरही त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.
Web Title: Aditya narayan snatched fan phone and throw away in live show while performing in college concert chhattisgarh nrps