Allu Arjun Birthday : ‘पुष्पा: द रुल’ ‘(Pushpa: The Rule) मधून दहशत निर्माण करण्यासाठी सज्ज असलेला अल्लू अर्जुन (Allu Arjun) कमाईमध्ये कोणत्याही स्टारच्या मागे नाही. अल्लू अर्जुनचे नाव फिल्म इंडस्ट्रीतील खूप श्रीमंत कलाकारांच्या यादीत समाविष्ट आहे. अल्लू अर्जुनकडे कोटींची संपत्ती आहे. स्वत:च्या व्हॅनिटी व्हॅनसह आलिशान गाड्यांचाही समावेश असल्याचं म्हटलं जातं.
अल्लू अर्जुनची नेट वर्थ
साऊथचा सुपरस्टार (South Superstar) अल्लू अर्जुन पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर (Box Office) धुमाकूळ घालण्यास सज्ज झाला आहे. अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) मोस्ट अवेटेड सिनेमा ‘पुष्पा: द रुल’(Pushpa: The Rule)चा क्रिप्टिक व्हिडिओ रिलीज झाला आहे. चित्रपटात लाल चंदनाची तस्करी करून पैसा कमावणारा अल्लू अर्जुन खऱ्या आयुष्यात संपत्तीच्या बाबतीत कुणापेक्षा कमी नाही. या अभिनेत्याचे नाव टॉलिवूडमधील अत्यंत श्रीमंत स्टार्समध्ये घेतले जाते. अल्लू अर्जुनच्या एकूण नेट वर्थबद्दल जाणून घेऊया.
अल्लू अर्जुनची कमाई
अल्लू अर्जुन सिनेमांमध्ये काम करून खूप पैसे कमावतो. प्रत्येक सिनेमासाठी अल्लू अर्जुन बारा ते पंधरा कोटींची तगडी फी घेतो. टॉलिवूडमधील सर्वात महागड्या कलाकारांमध्ये अर्जूनची गणना केली जाते. चित्रपटांशिवाय,अल्लू अर्जून सेव्हन अप, थम्सअप, एअरटेल, टाटा स्काय, डाबर आमला हेअर ऑइल आणि मिरिंडा सारख्या अनेक मोठ्या ब्रँडची जाहिरात करून पैसे कमवतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो प्रत्येक जाहिरातीसाठी एक कोटींहून अधिक फी घेतो. सेलिब्रिटी वर्थच्या अहवालानुसार अल्लू अर्जुनची एकूण संपत्ती 380 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
आलिशान घराचा मालक
अल्लू अर्जूनचे हैदराबादमध्ये आलिशान घर आहे. त्याच्या या घरात साऱ्या काही सोयीसुविधांचा समावेश करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या अभिनेत्याच्या घराची किंमत सुमारे शंभर कोटी रुपये आहे. अल्लू अर्जुनचे हे घर एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नाही.
लक्झरी कारचा शौकीन आहे अल्लू अर्जून
आलिशान घरासोबतच अल्लू अर्जुनला महागड्या कारचीही खूप आवड आहे. अल्लू अर्जुनच्या कार कलेक्शनमध्ये वोल्वो एक्ससी 90 टी8 (Volvo XC 90 T8) , मर्सिडीज बेंज जीएलई 350डी (Mercedes-Benz GLE 350d) , हमर एच2 (Hummer H2) , रेंज रोवर (Range Rover Vogue) आणि 7 कोटी रुपयांची व्हॅनिटी व्हॅन यांचा समावेश आहे. अनेक आलिशान कारचाही समावेश आहे.