‘बिग बॉस’च्या घरातून धनंजय पोवार Eliminate झाला आहे. प्रेक्षकांकडून कमी मतं मिळाल्यामुळे त्याचा प्रवास संपला आहे. यावेळी टॉप ४ मध्ये असलेल्या सर्वच स्पर्धकांचे कुटुंबीय उपस्थित होते. गार्डन एरियामध्ये रितेशने प्रत्येकाच्या कुटुंबीयांना envelope उघडायला लावलं. यावेळी डीपीच्या पत्नी कल्याणी यांनी कार्ड ओपन केल्यावर त्यात Eliminated लिहिलं होतं.
धनंजय पोवारच्या पत्नीला हुंदके अनावर
पती बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर धनंजय पोवारच्या पत्नीला आपले हुंदके अनावर झाले. धनंजयची पत्नी थेट बिग बॉसच्या घरात रडताना दिसली. यावेळी धनंजय पत्नीला समजून सांगताना देखील दिसला.