‘आई कुठे काय करते’ या मालिकेती अरुंधती म्हणजे महाराष्ट्रातील रसिरप्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री…या मालिकेमुळे अरुंधती म्हणजेच मधुराणी गोखले प्रभूलकर घराघरात जाऊन पोहचली….नुकताच मधुराणीने तिचा वाढदिवस साजरा केला. यावेळी तिच्या फॅन्ससह अनेक सेलिब्रिटींनीही तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. यात प्रामुख्याने संजना म्हणजेच रुपाली भोसलेने शेअर केलेली पोस्ट विशेष लक्षणीय ठरतेय.
यावेळी रुपालीने इन्स्टाग्रामवर अरुंधतीसोबतचे काही फोटो खास पोस्ट केले आहे. हे फोटो शेअर करत त्याला तिने हटके कॅप्शनही दिले आहे.
मधुराणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ती म्हणाली, “तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझा आजचा दिवस आणि येणारे वर्ष तुला खूप खूप छान जावो. तुला खरंच खूप खूप प्रेम आणि घट्ट मिठी. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे”. दरम्यान तिने शेअर केलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चचा विषय ठरत आहे.