आयुष्मान खुराना : मागील वर्षांपासून हिट चित्रपटाच्या शोधात असलेला अभिनेता आयुष्मान खुरानाला (Ayushmann Khurrana) अखेर हा चित्रपट मिळाला आहे. हा चित्रपट लॉकडाऊननंतरच्या चित्रपटांमध्ये त्याचा पहिलाच हिट चित्रपट ठरू शकतो. आयुष्मानचा नवीन चित्रपट ‘ड्रीम गर्ल २’ (Dream girl 2) शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली ताकद दाखवत आहे आणि या चित्रपटाने आयुष्मानच्या कारकिर्दीची सर्वात मोठी ओपनिंग गोळा केली आहे. ड्रीम गर्ल २ या चित्रपटाच्या रिलीजमुळे ब्लॉकबस्टर गदर २ या चित्रपटाच्या कमाईवर परिणाम होऊ शकतो.
ड्रीम गर्ल २ या चित्रपटाने शनिवारी कमाईमध्ये चांगलीच झेप घेतली आहे तर दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे. लॉकडाऊनपासून सलग ४ फ्लॉप चित्रपट देणाऱ्या आयुष्मान खुरानाला या चित्रपटाच्या कमाईमुळे मोठा दिलासा मिळाला असेल. ड्रीम गर्ल या चित्रपटाने शुक्रवारी १०.६९ कोटी रुपयांची कमाई करत ‘ड्रीम गर्ल २’ आयुष्मानच्या करिअरमधील सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरला आहे. शनिवारच्या ट्रेड रिपोर्ट्सनुसार दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत ४०% पर्यंत वाढ झाली आहे. शनिवारी या चित्रपटाने १४ ते १५ कोटींचा गल्ला जमवला आहे. आता दोन दिवसांत आयुष्मानच्या चित्रपटाच्या एकूण नेट इंडिया कलेक्शनने २५ कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
आयुष्मान खुराणाच्या चित्रपट असा आहे की दुसऱ्या दिवशी त्यांच्या कमाईत मोठी झेप आहे. पहिल्या दिवशी १०.०५ कोटींची कमाई करणाऱ्या ‘ड्रीम गर्ल’ने दुसऱ्या दिवशी १६.४२ कोटी रुपयांची कमाई केली. म्हणजेच दुसऱ्या दिवशी त्याच्या कमाईत ६०% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे आयुष्मानच्या ‘बाला’ला दुसऱ्या दिवशी ५०% पेक्षा जास्त उडी मिळाली. शनिवारी ड्रीम गर्ल या चित्रपटाचे कलेक्शन हे थोडे कमी होते. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे सनी देओलचा ‘गदर २’. शनिवारी १२ ते १३ कोटींची कमाई करणाऱ्या ‘गदर २’ पेक्षा आयुष्मानच्या चित्रपटाने नक्कीच चांगली कमाई केली आहे. पण तिसऱ्या आठवड्यात सुरू असलेला सनी देओलचा चित्रपट अजूनही नव्या रिलीजला आव्हान देत आहे. ‘गदर २’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करत आहे, याचाच हा पुरावा आहे. ड्रीम गिर्लने दोन दिवसांत २५ कोटींहून अधिक कमाई केली आहे.