Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘द काश्मीर फाईल्स’मुळे बच्चन पांडे फ्लॉप, तरीही अक्षयकुमारने मानले विवेक अग्निहोत्रीचे आभार, जाणून घ्या नेमकं काय..

काश्मीर फाईल्सने २०० कोटींचा गल्ला जमवला असला तरी बच्चन पांडे अद्याप ५० कोटींचा पल्लाही पार करु शकलेला नाही. आपला चित्रपट फ्लॉप झाल्याचे दुख अक्षय कुमारने व्यक्त केले आहे. काश्मीर फाईल्समुळे आपला चित्रपट बुडाला, अशी प्रतिक्रिया अक्षयने दिली आहे.

  • By Aparna Kad
Updated On: Mar 26, 2022 | 03:56 PM
‘द काश्मीर फाईल्स’मुळे बच्चन पांडे फ्लॉप, तरीही  अक्षयकुमारने मानले विवेक अग्निहोत्रीचे आभार, जाणून घ्या नेमकं काय..
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटापुढे अक्षय कुमारचा (Akshay Kumar) चित्रपट ‘बच्चन पांडे’ (Bacchan Pandey) टिकू शकला नाही. ११ मार्चला प्रदर्शित झालेल्या काश्मीर फाईल्सने २०० कोटींचा गल्ला जमवला असला तरी बच्चन पांडे अद्याप ५० कोटींचा पल्लाही पार करु शकलेला नाही. आपला चित्रपट फ्लॉप झाल्याचे दुख अक्षय कुमारने व्यक्त केले आहे. काश्मीर फाईल्समुळे आपला चित्रपट बुडाला, अशी प्रतिक्रिया अक्षयने दिली आहे.

मात्र तरीही विवेक अग्निहोत्रीचे मानले आभार

एका कार्यक्रमात अक्षयकुमार म्हणाला की- द काश्मीर फाईल्स या चित्रपटात काश्मिरी हिंदू पंडितांसोबत झालेल्या अत्याचाराचे सत्य दाखवण्यात आले आहे. हा चित्रपट एखाद्या आशीर्वादासारखा आहे. मात्र द काश्मीर फाईल्सने, माझा सिनेमा बच्चन पांडेची वाईट अवस्था केली आहे. मात्र तरीही मी विवेक अग्निहोत्रीचे आभार व्यक्त करतो की, त्याने काश्मीर फाईल्ससारखा सिनेमा तयार करुन, आपल्या देशातील एक दुखदायक सत्य समोर आणले आहे.

१६० कोटी बच्चन पांडेचे बजेट

१५ दिवसांत द काश्मीर फाईल्सने २११ कोटी जमा केले आहेत. तर बच्चन पांडे केवळ ४९ कोटींवर अडकून आहे. बच्चन पांडे सिनेमाचे बजेट १६० कोटी रुपये होते. त्याची कमाई पाहता हा चित्रपट फ्लॉप झाला असाच निष्कर्ष सध्या तरी काढण्यात येतो आहे. दुसरीकडे काश्मीर फाईल्सचे बजेट केवळ १२ कोटी होते, त्यापेक्षा २०० कोटींची अधिक कमाई या चित्रपटाने केली आहे.

काश्मीर फाईल्सच्या वादळात बच्चन पांडे उडाला

अक्षय कुमारचा बच्चन पांडे धुळवडीच्या दिवशी प्रदर्शित झाला. पण द काश्मीर फाईल्सच्या चर्चेत अक्षयच्या सिनेमाकडे अनेकांनी पाठ फिरवली. अक्षयसारखी मोठी स्टार कास्ट असूनही सिनेमागृहात प्रेक्षक फिरकलेच नाहीत. तर द काश्मीर फाईल्स पाहण्यासाठी एडव्हान्स बुकिंग होत होते. मात्र आता आरआरआर या सिनेमाची टक्कर द काश्मीर फाईल्सला मिळताना दिसते आहे. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी काश्मीर फाईल्सच्या गल्ल्यात घट झाल्याचे पाहायला मिळाले. शुक्रवारी केवळ ४.५ कोटींचा गल्लाच सिनेमाला जमवता आला.

Web Title: Bacchan pandey could not make big on boxoffice because of the kashmir files but akshay thanks to vicek agnihotri nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2022 | 03:29 PM

Topics:  

  • Akshay Kumar
  • The Kashmir Files

संबंधित बातम्या

‘हे’ काय म्हणाला अक्षर कोठारी! आदेश बांदेकर म्हणाले होते की,”डबक्याच्या बाहेर…”
1

‘हे’ काय म्हणाला अक्षर कोठारी! आदेश बांदेकर म्हणाले होते की,”डबक्याच्या बाहेर…”

Jolly LLB 3: अक्षय कुमार आणि अर्शद वारसीच्या केमिस्ट्रीने केला धमाका! चित्रपटाच्या टीझरने मिळवले मिलियन व्ह्यूज
2

Jolly LLB 3: अक्षय कुमार आणि अर्शद वारसीच्या केमिस्ट्रीने केला धमाका! चित्रपटाच्या टीझरने मिळवले मिलियन व्ह्यूज

कोटींचं बजेट आणि मोठा गाजावाजा, तरी देखील Raksha Bandhan च्या दिवशी रिलीज झालेले ‘हे’ 2 चित्रपट ठरले सुपर फ्लॉप
3

कोटींचं बजेट आणि मोठा गाजावाजा, तरी देखील Raksha Bandhan च्या दिवशी रिलीज झालेले ‘हे’ 2 चित्रपट ठरले सुपर फ्लॉप

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने मुंबईतील दोन मालमत्ता विकल्या, किंमत ऐकून व्हाल थक्क…
4

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने मुंबईतील दोन मालमत्ता विकल्या, किंमत ऐकून व्हाल थक्क…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.