Bhool Bhulaiyaa 3 रुह बाबा आणि मंजुलिका यांच्यातील लढत कोणत्या ओटीटीवर दिसणार ?
हॉरर कॉमेडी आणि सस्पेन्स असलेला ‘भुल भुलैया ३’चा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. ‘स्त्री २’ नंतर ‘भुल भुलैया’च्या ट्रेलरची जोरदारची चर्चा होत आहे. ‘भुल भुलैया ३’चा पहिला भाग २००७ मध्ये रिलीज झाला होता. त्यानंतर दुसरा भाग २०२२ मध्ये आणि २०२४ मध्ये तिसरा भाग रिलीज होत आहे. कार्तिक आर्यनने जबरदस्त अभिनय करत प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. दुसऱ्या भागात मंजुलिका नव्हती, आता तिसऱ्या भागात प्रेक्षकांचे खळखळून मनोरंजन करण्यासाठी मंजुलिका सज्ज झाली आहे. ३ मिनिट ५० सेकंदाच्या अफलातून ट्रेलरने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.
हे देखील वाचा – प्रसिद्ध वॉईस ओव्हर आर्टिस्टचं निधन, लोकप्रिय कार्टून कॅरेक्टरला दिला होता आवाज
कार्तिक आर्यन, विद्या बालन, माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरीसह तगडी स्टारकास्ट चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. ट्रेलरमध्ये जितकी कॉमेडी आहे तितकीच भितीदायक वातावरणही आहे. प्रेक्षकांना यंदाच्या दिवाळीत एक नाही तर दोन मंजुलिका आणि रूह बाबाला सामोरे जावे लागणार आहे. “रक्तघाट के इतिहास का वो काला सच, सिंहासन के लालच में सदियां बीत गईं और इस सिंहासन में झुलस रहा अतीत आज भी जिंदा है…” अशा वाक्याने ट्रेलरची सुरूवात होते. मंजुलिकाला ज्या बंद खोलीत कैद केले होते, त्याच खोलीच्या दारापासून ट्रेलरची सुरुवात होते. कार्तिक आर्यन पुन्हा एकदा त्याच स्वॅगसोबत प्रेक्षकांना दिसेल. या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना कार्तिक आर्यन आणि तृप्ती डिमरी यांचा लव्ह अँगलही पाहायला मिळणार आहे.
ट्रेलरच्या सुरुवातीला प्रेक्षकांना जबरदस्त कॉमेडी पाहायला मिळत आहे. पण ट्रेलरच्या मधल्या भागापासून प्रेक्षकांना भितीदायक वातावरण पाहायला मिळते. आजूबाजूला अंधार आणि दुसरी मंजुलिकाला म्हणजेच माधुरी दीक्षितला पाहून सगळ्यांनाच सरप्राईज मिळालं आहे. माधुरी ट्रेलरच्या मधल्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अनिस बझ्मी दिग्दर्शित हॉरर कॉमेडी सिनेमात कार्तिक आर्यन रुह बाबाच्या भूमिकेत तर विद्या बालन ओरिजनल मंजुलिका आणि माधुरी दीक्षितही मंजुलिका बनून प्रेक्षकांचं अफलातून मनोरंजन करते. काही प्रमाणात बुचकळ्यात टाकणारा ट्रेलर पाहून प्रेक्षकांना चित्रपटाची उत्सुकता वाटतेय. रुह बाबा विरूद्ध मंजुलिका हा सामना प्रेक्षकांना संपूर्ण चित्रपटात पाहायला मिळणार, हे नक्की…
हे देखील वाचा – एका नजरेत घायाळ… शर्वरीचे सोशल मीडियावरील नवे फोटो पाहून चाहते थक्क!
कार्तिक आर्यन, विद्या बालन, माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी यांच्यासोबत चित्रपटात प्रमुख भूमिकेत, राजपाल यादव, विजय राज, संजय मिश्रा, अश्विनी काळसेकर, राजेश शर्मा हे सुद्धा प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. यांचेही ट्रेलरमधील कॉमेडी सीन्सने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहेत. ‘भुल भुलैया ३’ दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजेच, १ नोव्हेंबर २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर ‘भुल भुलैया ३’सोबत ‘सिंघम अगेन’ चित्रपट रिलीज होणार आहे. हे दोन्हीही चित्रपट एकमेकांना टक्कर देणार आहे. ‘सिंघम अगेन’चा ट्रेलर नुकताच ८ ऑक्टोबरला रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाच्या ट्रेलरला चाहत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.